esakal | दारु पिऊन एटीएममध्ये घुसला, सीसीटीव्हीला चिखल लावला अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

Crime_ATM_Loot

मांजरीतील एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना कोणीतरी चिखल लावला असून सेंटरमध्ये चोर घुसला असल्याबाबत संशय व्यक्त केला.

दारु पिऊन एटीएममध्ये घुसला, सीसीटीव्हीला चिखल लावला अन्...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चिखल लावून मशिनचा दरवाजा तोडून आतील पैशांची दारुच्या नशेत चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणास हडपसर (Hadapsar) पोलिसांनी अटक केली. मांजरीतील घुले शाळेजवळील एका खाजगी बँकेच्या एटीएममध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला.

राहुल माणिक तुपेरे (वय ३०, रा. कुंजीरवस्ती, मांजरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई आकाश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरक्षण धोरणाची व्यवस्थित अंमलबजावणी करा; पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी भागात एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. शनिवारी (ता.८) रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बँकेच्या मुंबई येथील सीसीटीव्ही कंट्रोल रूममधील कर्मचाऱ्यांनी पुणे शहर पोलिस नियंत्रण कक्षास कॉल केला. मांजरीतील एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना कोणीतरी चिखल लावला असून सेंटरमध्ये चोर घुसला असल्याबाबत संशय व्यक्त केला.

प्रज्ञाचा अपघात नव्हे घात; पुन्हा चौकशी करण्याची पोलिस अधिक्षकांची ग्वाही​

मांजरी मार्शल फिर्यादी गायकवाड आणि पोलिस शिपाई कांबळे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटर येथे धाव घेतली. तेथे आरोपी तुपेरे याने सीसीटीव्हींना चिखल लावला होता. तसेच सायरनचे नुकसान करून मशिनचा पत्रा तोडत असताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. चौकशी दरम्यान, आरोपी हा वाळू विक्रीचा धंदा करतो, अशी माहिती पुढे आली. पैशासाठी दारुच्या नशेत हे कृत्य केले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image