इंदापूर एस.टी कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर एस.टी कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

इंदापूर एस.टी कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

पुणे (इंदापूर) : एस. टी महामंडळ कामगारांचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाच्या सहाव्या दिवशी कामगारांनी शासनाचा निषेध करत अर्धनग्न आंदोलन करून आपल्या व्यथा प्रगट केल्या. यावेळी कामगारांनी प्रवाश्यांची दिलगिरी व्यक्त करत मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीची व्यथा विशद केली.

शासन आम्हास वेठबिगार म्हणून वागणूक देत आहे, दिवाळीत आम्ही मुलांना फटाखे देवू शकलो नाही, त्यांना कपडे, फराळ व दुध देखील देता आले नाही, वडिलांना मणक्याचा विकार आहे मात्र पगारात भागत नसल्याने त्यांचा एमआरआय देखील करता येत नाही, त्यांच्यावर मोठ्या दवाखान्यात उपचार देखील करता येत नाही, शिळ्या भाकऱ्या आम्हास खाव्या लागतात या शब्दात कामगारांनी आपल्या व्यथा मांडल्या.

सरकार पळून जाणाऱ्या उद्योगपतींना मदत करते, मात्र सुरक्षित प्रवासी वाहतूक करणाऱ्या कामगारांचा विचार करत नाही, त्यामुळे आजपर्यंत ३९ कामगारांनी आत्महत्या केल्या. त्यास जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी संतप्त कामगारांनी विचारला.

हेही वाचा: ST STRIKE: विलीनीकरणाची मागणी मान्य होऊ शकत नाही - अनिल परब

दरम्यान शासनाने दहा दिवसांत एस टी कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास शासनाचा दहावा घालण्याचे सूतोवाच अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पवन घोगरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रविण पवार, तालुकाध्यक्ष सचिन देवकर,शहराध्यक्ष आश्रम फडतरे, उपाध्यक्ष दीप राजवीर, कार्याध्यक्ष काशिनाथ अनपट, गणेश चोपडे, विशाल मेंगडे, मयूर चव्हाण आदींनी या आंदोलनास पाठिंबा दिला.

loading image
go to top