हनुमंत नाझीरकर अन् त्यांच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल; तब्बल 'एवढी' बेहीशोबी मालमत्ता आढळली

Hanumant Nazirkar and his family charged with possession of disproportionate assets
Hanumant Nazirkar and his family charged with possession of disproportionate assets
Updated on

पुणे : बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी अमरावतीच्या नगररचना विभागातील सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यासह त्यांच्या पत्नी, मूलगा व मुलगी अशा चौघाविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभगाने त्यांच्या घरी घातलेल्या छाप्यात उत्पन्नापेक्षा दोन कोटी 75 लाख रूपयांची जादा रक्कम, मालमत्ता त्यांच्याकडे आढळली. नाझीरकर व त्यांच्या कुटुंबाच्या नावावर पुणे शहर, जिल्हा व सातारा येथे सदनिका, दुकाने व जमीन असल्याची माहिती पुढे आली आहे.

हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय 53), त्यांच्या संगिता हनुमंत नाझीरकर (वय 45 ), मुलगी गीतांजली हनुमंत नाझीरकर (वय 23) व मुलगा भास्कर हनुमंत नाझीरकर (वय 23, रा.  स्वप्नशिल्प हौसिंग सोसायटी कोथरूड) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक सीमा मेहेंदळे यांनी फिर्याद दिली आहे.

एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर

लाचलुचपत विभागने दिलेल्या माहितीप्रमाणे, नाझीरकर हे अमरावती विभागाच्या नगररचना विभागात सहसंचालक या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मागील काही वर्षात बेहीशोबी मालमत्ता वाढल्याची तक्रार अलंकार पोलिस ठाण्यात दाखल होती. या तक्रारीच्या अनुषगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या पथकाने गुरुवारी सकाळी त्यांच्या कोथरुड येथील घरी छापा घातला. तपासणीमध्ये 2002-3 मध्ये नाझीरकर यांच्याकडे एक लाख 44 हजार इतकी रक्कम, मालमत्ता होती, तर 2015-16 मध्ये त्यामध्ये वाढ होऊन ही रक्कम दोन कोटी 47 लाख 25 हजार इतकी झाली. तर 2016-17 मध्ये 35 लाख 52 हजार आणि 2017-18 मध्ये एक लाख 17 हजार इतक्या प्रमाणामध्ये बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचे तपासामध्ये पुढे आले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधिक्षक वर्षाराणी पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com