

Veteran Athlete Harischandra Thorat Shines at Maharashtra Master Games
Sakal
निरगुडसर : वयाच्या बहात्तरीत सुद्धा सुवर्णपदके मिळण्याचा सपाटा निरगुडसर ता.१५() एखाद्या तरुणाला लाजवेल अशी कामगिरी वयाच्या बहात्तरीत सुधा खडकीफाटा (ता.आंबेगाव)येथील हरिश्चंद्र रामभाऊ थोरात हे करत आहेत. वयाच्या बहात्तरीत सुद्धा सुवर्णपदके मिळण्याचा सपाटा सुरू असून भोसरी येथे झालेल्या राज्यस्तरीय मास्टर गेम्स स्पर्धेत चालणे आणि धावणे यामध्ये थोरात यांनी तीन सुवर्ण पदके पटकावले,तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी हरिश्चंद्र थोरात यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.