Rajgad cow vigilante attack on a youth; extortion and assault case
घरकाम करणाऱ्या महिलांकडून २० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
पुणे, ता. १५ : घरकाम करणाऱ्या महिलांनी ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून १९ लाख ८० हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना सॅलिसबरी पार्क भागात घडली. याप्रकरणी चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६१ वर्षीय डॉक्टर महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार या कोंढव्यातील उंड्री भागात राहायला आहेत. त्यांची आई सॅलिसबरी पार्क भागातील गिडनी पार्क येथे राहते.