Harishchandra Thorat : ७० वर्षाचा तरुण धावपट्टू ; हरिश्चंद्र थोरात यांची भारतीय संघात निवड

गोवा येथे झालेल्या मास्टर्स गेम्स राष्ट्रीय स्पर्धेत खडकीफाटा (ता.आंबेगाव) येथील हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांनी ६५ वर्ष व त्या पुढील गटातील धावणे आणि चालणे क्रिडा प्रकारात दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावून पुढील महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघात स्थान पटकावले आहे
Harishchandra Thorat
Harishchandra Thorat sakal

निरगुडसर : गोवा येथे झालेल्या मास्टर्स गेम्स राष्ट्रीय स्पर्धेत खडकीफाटा (ता.आंबेगाव) येथील हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांनी ६५ वर्ष व त्या पुढील गटातील धावणे आणि चालणे क्रिडा प्रकारात दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावून पुढील महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघात स्थान पटकावले आहे, ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा १३ ते २५ ऑगस्ट २०२४ दरम्यान स्वीडन देशात होणार आहे.

गोवा येथे नुकत्याच राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या,या स्पर्धेत खडकी फाटा येथील हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांनी सहभाग घेतला होता, यामध्ये ६५ वर्ष वयोगटातील आणि त्यापुढील गटातील ५ किमी धावणे मध्ये प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावले तसेच ५ किमी. चालणेमध्ये सुवर्ण पदक,दीड किमी धावणे मध्ये कांस्यपदक मिळवले आहे.

यातून थोरात यांची पुढील महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघात निवड झाली आहे.तसेच बालेवाडी(पुणे) येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेत हरिश्चंद्र थोरात यांनी पाच किमी वॉक स्पर्धेत सुवर्णपदक,१० किमी धावणे स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे त्याबद्दल खडकी, चांडोली बुद्रुक ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

७० वर्षाचा तरुण धावपट्टू : धावपटू हरिश्चंद्र थोरात यांनी ६० वर्षांवरील झालेल्या ऑस्ट्रेलिया व मलेशिया येथील ३ आंतरराष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेत सहभाग घेऊन रौप्य व कांस्य पदक पटकावले आहे तसेच १० राष्ट्रीय आणि १० राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स स्पर्धेत १२ सुवर्णपदक पदक पटकावण्याचा मान मिळवला आहे तसेच आत्ता पर्यंत ११५ मॅरेथॉन स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com