esakal | Sakal Impact : हवेली पोलिसांचा 'ताडी' गुत्त्यावर छापा
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Sakal Impact : हवेली पोलिसांचा 'ताडी' गुत्त्यावर छापा

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला ताडीच्या गुत्त्यावर छापा टाकून हवेली पोलिसांनी 35 लिटर बनावट 'ताडी' व सुमारे 250 ग्रॅम वजनाचा खडीसाखरेसारखा दिसणारा पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी बशीर मानतेश भंडारी (वय 37, खडकवासला) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Lakhimpur violence: आशिष मिश्रा पोलिसांसमोर हजर


हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत बनावट ताडी विक्री, गावठी दारू विक्री सुरू असल्याबाबतचे वृत्त दि. 8 ऑक्टोबर रोजी दै. 'सकाळ'मधून प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन हवेली पोलीसांनी अवैध धंद्यांवरील कारवाईला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: परमबीर सिंह यांच्या घरावर मुंबई पोलिसांची नोटीस

खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला काही अंतरावर ताडी विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलीसांच्या पथकाने छापा टाकून बशीर भंडारी यास ताब्यात घेतले आहे. यावेळी पस्तीस लिटर बनावट ताडी, सुमारे दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचा खडीसाखरेसारखा दिसणारा रासायनिक पदार्थ व एक गाळण असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार रामदास बाबर यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे हे अधिक तपास करत आहेत

loading image
go to top