esakal | लाच प्रकरणात एचडीएफसी बँकेच्या व्यवस्थापकासह दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

jail.jpg

बारामती शाखेत झाली कारवाई; कर्जमंजुरीसाठी मागितले पावणेतीन लाख

लाच प्रकरणात एचडीएफसी बँकेच्या व्यवस्थापकासह दोघांना अटक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे :  कर्जमंजुरीसाठी एकाकडून दोन लाखांची लाच घेणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या बारामती शाखेतील व्यवस्थापकासह प्रतिनिधीला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (सीबीआय-एसीबी विंग) शुक्रवारी रंगेहात पकडले.

वीजग्राहकांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता

याप्रकरणी व्यवस्थापकासह दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्या दोघांनी लाच मागितल्या प्रकरणी एकाने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराने एचडीएफसी बँकेच्या बारामती शाखेत 99 लाख रुपयांचे कर्जप्रकरण दाखल केले आहे. संबंधित कर्ज प्रकरण मंजुर व्हावे यासाठी तक्रारदाराकडून पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र कर्ज मंजूर करण्यासाठी बँकेतील व्यवस्थापक आणि प्रतिनिधीने तक्रारदाराकडे दोन लाख 70 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत तक्रारदाराने सव्वा दोन लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर या गैरकारभारविरुद्ध सीबीआयकडे तक्रार दिली.

तक्रारीची तपासणी करण्यात आल्यानंतर शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने सापळा लावला. व्यवस्थापकाने लाचेची रक्कम घेण्यासाठी प्रतिनिधीला पाठविले होते. तक्रारदाराकडून दोन लाखांची स्विकारताना प्रतिनिधीला पकडण्यात आले. लाच बाबत चौकशी करण्यात आल्यानंतर या प्रकरणात बँकेतील व्यवस्थापक देखील सहभागी असल्याचे उघड झाल्यानंतर त्याला देखील अटक करण्यात आली आहे. 

पुण्यात या ठिकाणी रुग्णांना मिळतोय दिलासा

दोघांविरोधात बँकेकडूनही कारवाई होणार : 
लाचेचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एचडीएफसी बँकेकडून प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, कोणत्याही कर्मचाऱ्याकडून गैर व बेजबाबदार वर्तन घडल्यास बँकेकडून कारवाई करण्यात येईल. कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. बारामती शाखेतील व्यवस्थापकासह दोघांविरोधात बँकेकडून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणात बँकेकडून पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल.