मेंढपाळांच्या वाड्यावर धन्वंतरीचे पूजन!

आज या रानात, तर उद्या त्या; ऊन-वारा असो की पाऊस... त्यांची भटकंती सदैव सुरूच. दिवसभर डोंगर-रानात मेंढरं चारायची.
Health Checking Camp
Health Checking CampSakal

पुणे - आज या रानात, तर उद्या त्या; ऊन-वारा असो की पाऊस... त्यांची भटकंती सदैव सुरूच. दिवसभर डोंगर-रानात मेंढरं चारायची. दिवस उतरायला लागला, की वाड्याची वाट धरायची, हाच त्यांचा दिनक्रम. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाही त्यांच्याकडे वेळ नाही. (Health Checking to Shepherd)

...गावोगावचं शिवार, डोंगर-दऱ्यांचा सवंगडी बनून जिणं जगणाऱ्या मेंढपाळांची ही व्यथा. कोरोना संसर्गाच्या काळात त्यांच्याकडे फारसं कोणाचं लक्षही गेलं नाही. हीच बाब हेरत पुण्यश्‍लोक फाउंडेशनने त्यांच्यापर्यंत पोहचत त्यांची आरोग्य तपासणी करून आवश्‍यक औषधोपचार केले. या उपक्रमातून फाउंडेशनने मेंढपाळांच्या वाड्यावर एक प्रकारे धन्वंतरीची पूजा बांधली. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व ‘धनगर माझा’च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत फाउंडेशनने हा उपक्रम राबविला.

Health Checking Camp
पुणे : 'आरटीओ'चे कामकाज होणार मंगळवारपासून सुरू

या उपक्रमाचे आयोजन धनंजय तानले यांनी केले. डॉ. चंद्रशेखर कोकाटे, डॉ. सागर शेंडगे, डॉ. सौरभ सलगर, डॉ. दिनेश गाडेकर, डॉ. श्वेता गाडेकर, डॉ. दादासाहेब पडळकर, डॉ. सत्यवान गडदे आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी उपक्रमात भाग घेऊन मेंढपाळ कुटुंबीयांची आरोग्य तपासणी केली. राजेंद्र गाडेकर, सागर खटके, सागर कोळेकर, महावीर सरक, ज्ञानदेव काळे, विकास हजारे, अमोल चोपडे, रामजी कोळेकर, पांडा कोळेकर आदींनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

डॉक्टरांची टीम शिवारात

मावळ तालुक्यातील सुदुंबरे, खालुंब्रे, भंडारा डोंगर, म्हाळुंगे, नवलाख उंबरे, कासारसाई, चांदखेड, पुसाणे आदी गावांच्या शिवारात विसावलेल्या मेंढपाळांच्या वाड्यांवर डॉक्टरांच्या टीमसह फाउंडेशनचे कार्यकर्ते जात होते. दोन दिवसांत दोनशे जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com