आपल्या काळजासाठी द्या रोज ४० मिनिटे ! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

लॉकडाउननंतर आता आपण सर्वजण ‘न्यू नॉर्मल’ जीवनशैली अंगिकारण्याच्या प्रयत्न आहोत. कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या आणि संसर्ग न झालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांनी आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी दिवसभरात ४० मिनिटं चाललं पाहिजे, असे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी सांगितले. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांनी रक्त पातळ होण्याची औषधे दोन महिने जरूर घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे - दिवसातील एक हजार ४४० मिनिटांपैकी तुमच्या हृदयासाठी तुम्ही फक्त रोजच्या रोज न चुकता ४० मिनिटे द्या... तुमचे हृदय तंदुरुस्त राहील... असा सल्ला पुण्यातील हृदयरोग तज्ज्ञांनी दिलाय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउननंतर आता आपण सर्वजण ‘न्यू नॉर्मल’ जीवनशैली अंगिकारण्याच्या प्रयत्न आहोत. कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या आणि संसर्ग न झालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांनी आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी दिवसभरात ४० मिनिटं चाललं पाहिजे, असे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी सांगितले. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांनी रक्त पातळ होण्याची औषधे दोन महिने जरूर घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात महामेट्रोला मोठा ब्रेक थ्रू; 1600 मीटरचा बोगदा पूर्ण

उपचारातील बदल 
कोरोना उद्रेकापूर्वी हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्याच्या मार्गदर्शक सूचना जगभर होत्या. तशाच त्या आपल्याही देशात होत्या. त्यानंतर रक्त पातळ करण्याची औषध देण्याचा सल्ला दिला जाई. पण, कोरोना उद्रेकात रक्त पातळ करण्याची औषधे ही सर्वप्रथम रुग्णाला देण्यात येतात. हा उपचारातील बदल कोरोनात झाला. कारण, कोरोना झालेल्यांच्या रक्तात गाठ निर्माण होऊन तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांना रक्त पातळ होण्याचे औषध दिल्यानंतर ते बरे झाले. कोरोनामुळे या रक्ताच्या गाठी तयार झाल्या होत्या. कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन तयार होणारा हा अडथळा नव्हता, असे निदान झाल्याची माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल पाटील यांनी दिली.

कोरोनावर मात करण्यासाठी गणरायाकडे साकडे; दगडूशेठ गणपतीसमोर सलग 15 दिवस वेद पठण

कशी असावी न्यू नॉर्मल जीवनशैली

  • कोरोनामुळे बाहेर जाता आले नाही तरी घरच्याघरीच चाला.
  • घरामध्येच योगासने करा.
  • कोणाच्या जास्त संपर्कात येऊ नका.
  • ‘व्हिटॅमिन सी’चा आहारात समावेश करा.

कोरोनाच्या भीतीने रुग्ण आजार अंगावर काढतात, ते उपचारांसाठी रुग्णालयात जात नाहीत. छातीत दुखतंय, ॲसिटीडी असेल, तर यामुळे घाबरून न जाता, तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
- डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयरोगतज्ज्ञ

आकडे काय सांगतात

  • ८ ते १० दशलक्ष हृदयविकाराचे रुग्ण 
  • ५० टक्के यांपैकी उपचारांसाठी दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 
  • सुमारे २० लाख दरवर्षी हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांची संख्या 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Give 40 minutes a day for your worries