कात्रज - धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आयोजित मोहल्ला कमिटीच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी उद्धव कांबळे यांच्यात जोरदार वादावादी झाली. नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीत राजकीय कुरघोडी आणि दोन सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यात वाद झाल्याने हा चर्चेचा विषय बनल्याचे पाहायला मिळाले.