पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

आज गुडीपाडवा असल्यामुळे नागरिकांनी घरात गुडी उभारुन हिंदु नववर्षाची सुरवात केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली आहे.

पुणे : पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट, ढगांची गडगडाट, जोर जोरात वाहणारे वारे आणि धो धो कोसळणार मुसळधार पावसान पुणे शहरात सुरु आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २१ दिवस देश लॉकडाऊन केल्यामुळे सर्व नागरिक घरातच आहेत. त्यामुळे यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली नाही.  

- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुड न्यूज; देशातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य कोरोनामुक्त

आज गुडीपाडवा असल्यामुळे नागरिकांनी घरात गुडी उभारुन हिंदु नववर्षाची सुरवात केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहरातील कात्रज, आंबेगाव, बिबवेवाडी, सहकारनगर, पद्मावती, सातारा रस्ता, धनकवडी, औंध कोथरुड, भेकराईनगर, सिंहगड रस्ता परिसर, पुणे कॅन्टोन्मेंट, घोरपडी आणि शहरातील मध्यवर्ती भागात पावसाची दमदार हजेरी लावली.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain comes in Pune city with thunderstorm

टॅग्स
टॉपिकस