

Rain Wreaks Havoc in Pune Suburbs; Major Traffic Disruption on Solapur–Saswad Highway
esakal
-कृष्णकांत कोबल
हडपसर: पहाटेपासून सुरू असलेला पाऊस, ठिकठिकाणी पडलेला रस्त्याच्या कामातील राडारोडा, खड्डे व त्यामध्ये साचलेले पाणी आणि बंद पडलेल्या वाहनांचा अडथळा यामुळे येथील सोलापूर व सासवड पुणे या मार्गावरील वाहतूक सुमारे सहा तास मंदावली होती. शेवाळेवाडी व फुरसुंगी ते पुलगेट पर्यंत वाहनांच्या रांगा रेंगाळल्या होत्या. त्यामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थी व दैनंदिन कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.