Video : पुणे : मुसळधार पावसाचा नगर रोडच्या रहिवाशांना फटका...घरात शिरले पाणी

Rain-Pune
Rain-Pune

रामवाडी - नगररोड भागात काल संध्याकाळी  (ता. 2 )झालेल्या  मुसळधार पावसाचा फटका स्थानिक रहिवाशांना बसला.अनेक सोसायटया आणि बैठया घरात पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. या वर्षी पालिका प्रशासनाकडून 90 टक्के  कामे पुर्ण झाल्याचा दावा सपशेल फोल ठरल्याने या भागातील रहिवाशांचे अर्थिक नुकसान झाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

प्रत्येक वर्षी  पालिकेकडून कोट्यवधी रूपये खर्च नालेसफाई केली जाते तरी ही पावसाचे पाणी रहिवाशांच्या घरादारात तसेच सोसायट्यांमध्ये शिरते. प्रशासनाने या भागात  कायमस्वरूपी तोडगा काढावा,अशी मागणी रहिवाशांना  कडून केली जात आहे.

पावसामुळे कोरोना धुऊन जातोची ‘व्हायरल’ चर्चा; तज्ञ काय सांगतात?
 
संध्याकाळी दोन तास मुसळधार पाऊस पडल्याने सोमनाथनगर मधील साईकृपा सोसायटी, गार्डेनिया फेज वन, शुभम सोसायटी तसेच उज्वल गार्डन, सैनिकवाडी, करण सीटो या ठिकाणी पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांचे अर्थिक नुकसान झाले आहे.

गार्डेनिया सोसायटी मधील  विहिरी जवळचे मोठे बदामचे  झाड, विहिरीचा कठडा भिंत,  विदुयत खांब,  त्याचबरोबर ज्या खांबावर  सी सी टीव्ही कॅमेरा बसवलं होते ते ही सर्व वारा व  मुसळधार पावसाने तुटून विहिरी पडले आहे.  

पिण्याच्या पाण्याची मोटार पंप  बंद पडले आहे. तसेच  पालिकेकडून ऑगस्ट महिन्यात बांधण्यात आलेली  शुभम सोसायटीतील 60 फूट लांबीची  सीमाभिंत कालच्या पावसानं पडल्याची माहिती रहिवाशी हरिश वाणी यांनी  दिली. तर  साईकृपा सोसायटीमधील सात ते आठ घरात कमरे ऐवढे पावसाचे पाणी शिरल्याने घरातील वस्तु बरोबर साठवणूक केलेलं अन्नधान्य भिजले.  या ठिकाणी अधिकृत  तसेच अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले आहे.  सदर ठिकाणी ओपन नाला आहे. काही नागरिकांनी  विटामातीचा राडारोडा,  प्लास्टिक, कचरा टाकल्याने दुर्गंधी पसरली आहे असे  बलराम मुळीक यांनी सांगितले.  

घरात पाणी शिरू लागल्याने या वर्षी गार्डेनिया सोसायटीची  सीमाभिंत तोडण्याचा प्रयत्न सोसायटीच्या मागे राहणाऱ्या नागरिकांनी केला असता सोसायटीच्या रहिवाशांनी विरोध केला तसेच पोलिसांना कॉल करून बोलवण्यात आल्याने सीमाभिंत वाचवता आली असे रहिवाशी शरद अडसुळ यांनी सांगितले.

'सैनिकवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र जवळ 900  मिली मीटर व्यासाच्या चार पावसाळी वाहिन्या टाकल्यावर पावसाचं पाणी जाण्यास सुलभ होईल कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. वाहिन्या टाकण्याचे  काम दोन दिवसात पुर्ण होईल. तात्पुरती का होईना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालुन दिलेले नियम बाजुला ठेवून रहिवाशी  एकमेकांच्या मदतीला धावून जात होते. कोणी बुडता संसार वाचवत होते तर कुठे बंद पडलेल्या गाड्यांना धक्का देऊन गाड्या  सोसायटीच्या बाहेर सुरक्षित स्थळी पोहचवण्यासाठी मदत करत होते."
- प्रविण गेडम, मुख्य अभियंता मलनिःसरण व देखभाल विभाग पुणे महानगर पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com