पुणे : गुरुराज सोसायटीत पुन्हा शिरले पाणी अन् नागरिकांना आठवला 'तो' पाऊस

नितीन बिबवे
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे गुरुराज सोसायटीत चार ते पाच फुटांनी पाणी आत आले होते. नागरीकांनी रात्रीत घरे खाली केली. तीन इमारतींचे पार्किंग पाण्याखाली गेले आहे.

पुणे : पुणे शहरासह उपनगरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबील ओढ्याला पूर आलेला असून, ओढ्यालागतच्या गुरुराज सोसायटीत पाणी शिरले. त्यामुळे येथील नागरिकांना पुन्हा त्या क्षणाची आठवण झाली.

पुण्याला पुन्हा पावसाने झोडपले; सोसायट्या, घरांमध्ये पाणी

मिळालेल्या माहितीनुसार, आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे गुरुराज सोसायटीत चार ते पाच फुटांनी पाणी आत आले होते. नागरीकांनी रात्रीत घरे खाली केली. तीन इमारतींचे पार्किंग पाण्याखाली गेले आहे. नागरिकांनी वाहने सातारा रस्त्यावर लावलेली आहेत.

मागील पुराचा धसका घेतलेला असून रात्री आलेल्या पुरामुळे नागरिक घाबरलेले आहेत. प्रशासनाने सोसायटीत येणारे पाणी थांबविण्यासाठी व्यवस्था करावी अशी नागरिकांची मागणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in Pune and water logging in societies