वरुणराजाची अर्ध्या पुण्यावरच कृपा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

पुण्यातील मध्यवस्तीसह उपनगरांतील काही भागात आज दुपारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी तीननंतर पावसाला सुरुवात झाल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली.

पुणे : पुण्यातील मध्यवस्तीसह उपनगरांतील काही भागात आज दुपारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी तीननंतर पावसाला सुरुवात झाल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली. पेठांच्या परिसरात पावसाच्या धुवाधार सरी बरसत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हडपसर, वाघोली, आंबेगाव, वडगावशेरी, वडगाव, धायरी, नऱ्हे, महर्षीनगर, सातारा रस्ता, गुलटेकडी आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर औंध, बाणेर रस्ता, पाषाण, पंचवटी, सूसरस्ता, महाळुंगे व सूस परिसरात आभाळ भरुन आले आहे. परंतु, अजून पाऊस सुरू झाला नाही. घोरपडी आणि वानवडी परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. अचानक पाऊस सुरु झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे. घोरपडीमधील बालाजीनगर भागात घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

सिंहगड रस्ता परिसरात पाऊस सुरु झाला सुमारे पंधरा ते वीस मिनिटं जोरात पाऊस झाला. त्यानंतर परिसरात ढगाळ वातावरण तसेच गार वारा वाहत आहे. पाऊस मात्र, थांबला आहे. कात्रज, गोकुळ नगर भागात अद्याप पाऊस नाही. आभाळ आले आहे.

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains begin in Pune