Pune Rains : जोरदार पाऊस पुण्याला झोडपतोय! अजून 2 दिवस...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

पुण्यात पुढील दोन दिवस पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे.

पुणे : शहरात सकाळपासून जोरदार पावसाला सुरवात झाली. मॉन्सून देशातून परत गेला मात्र पुण्यातील पावसाळा काही संपत नाही, अशा आशयाचे खास पुणेरी शैलीतील आशयाचे संदेश सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. पुढील दोन दिवस पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे.

Vidhan Sabha 2019 : एक सभा वॉटरप्रुफ मांडवातली; अन् एक भर पावसातली...!

शहर आणि परिसरात शनिवारी सकाळपासून पाऊस पडत आहेत. देशातून दोन दिवसांपूर्वीच मॉन्सून परत फिरला. त्याच वेळी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. लक्षद्वीपच्या परिसरात याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर येथे पुढील दोन ते तीन दिवस आकाश ढगाळ रहाणार असून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.

आज सकाळपासून सिंहगड रस्ता, कात्रज, हडपसर व पुण्याच्या इतर भागातही पावसाचा जोर आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Pune today and after 2 days