वेल्ह्यात तुफान पाऊस, राजगडाकडे जाणाऱ्या पुलावर पाणी 

मनोज कुंभार
Wednesday, 5 August 2020

वेल्हे तालुक्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्यात गेल्या चोवीस तासात सरासरी १५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, तालुक्यातील भातपिकांना जीवदान मिळाले, तर रखडलेल्या भातलावण्या पुन्हा सुरु झाल्या आहेत.

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्यात गेल्या चोवीस तासात सरासरी १५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, तालुक्यातील भातपिकांना जीवदान मिळाले, तर रखडलेल्या भातलावण्या पुन्हा सुरु झाल्या आहेत. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे.

आॅनलाइनचा नवा फिटनेस फंडा

वेल्हे तालुक्यात गेल्या दोन दिवसांनपासून पावसाने हजेरी लावली असून, काल (ता. ४) रोजी पावसाचा जोर वाढल्याने तालुक्यातील नद्या, ओढे, नाले दुथडी वाहू लागले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याच्या किरकोळ घटना घडल्या होत्या. तर, राजगड किल्ल्याकडे जाणारा साखर गावाजवळील पुलावरून पाणी जात होते, परंतु वाहतुक सुरळीत होती. तालुक्यात या वर्षीतील सर्वात जास्त पावसाची नोंद गेल्या चोवीस तासांत झाली आहे.

पुण्यात रेल्वेे, विमान, रिक्षा, कॅबला परवानगी, पण पीएमपीला

जोरदार पडलेल्या पावसाने भात पिकांना जीवदान मिळाले असून, ऱखडलेल्या भातलावण्या पुन्हा सुरु झाल्याने  शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. असे असले तरी यावर्षी तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे. जुलै २०१९ अखेर १६६६ मि.मी. सरासरी पाऊस पडला होता, तर या वर्षी जुलै २०२० अखेर फक्त ३४७ मि.मी. पाऊस पडला आहे. 

यंदा डाळिंबाचा नाद करायचा नाय

वेल्हे तालुक्यात चार मंडल असून, यामध्ये सर्वात जास्त पाऊस गुंजवणी धरण भागामध्ये झाला. वेल्हे मंडलमध्ये १८३ मि.मी., पानशेत परिसरात १५९ मि.मी., विंझर मंडलात १५३ मि.मी., तर अंबवणे मंडलात ११७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सरासरी १५३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Velhe taluka