नाताळच्या सुट्टीमुळे सलग दुसऱ्या दिवशी पुणेकर अडकले कोंडीत

 महेंद्र शिंदे
Sunday, 22 December 2019

नाताळच्या सुट्यांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे शनिवारी खेड-शिवापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती तर, आज रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही नाताळ सुट्यांमुळे नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे रविवारी सकाळपासून साताऱ्याकडे जाणाऱ्या टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

खेड-शिवापूर : सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांना पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नाताळाच्या सुट्ट्यानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरिकांमुळे रविवारीही खेड-शिवापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रविवारी सकाळपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. टोल प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

पुणे धावले! बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाताळच्या सुट्यांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे शनिवारी खेड-शिवापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती तर, आज रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही नाताळ सुट्यांमुळे नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे रविवारी सकाळपासून साताऱ्याकडे जाणाऱ्या टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांनो, बालभारती आणतंय तुमच्यासाठी काही खास!

टोल नाका ते दर्गा चौकापर्यंत सुमारे दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीत प्रवाशांचा वेळ वाया जात असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. टोल नाक्यावरून बाहेर पडण्यास प्रवाशांना सुमारे वीस मिनिटे वेळ लागत आहे. सुट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन टोल प्रशासनाने वाहतूकीचे नियोजन करणे गरजेचे होते, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करत आहेत.

पुणे हाफ मॅरेथॉन'मध्ये गोरखा रेजिमेंटचा तीर्थ पुन विजेता

तसेच शनिवार प्रमाणे आजही फास्टॅग मार्गिकेतून इतर वाहने सोडली जात आहेत. त्यामुळे आजही येथील टोल नाक्यावरील फास्टॅग यंत्रणा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे फास्टॅग वाहन चालक नाराजी व्यक्त करत आहेत.

पिंपरी : अनैतिक संबंध उठताहेत जिवावर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy traffic jam in Pune Satara toll Due to the Christmas holidays