मनसे, भाजपमुळे पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा ! कोल्हापूर, जळगावला चार बस रवाना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

​ रविवारी दुपारी १२च्या सुमारास स्वारगेट बसस्थानकातून ४४ विद्यार्थी बसने रवाना झाले, सोमवारी मनविसेतर्फे नगर आणि नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी दोन बस सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी ३० हजार रुपये एसटीकडे जमा केले आहेत.

पुणे : राज्य सरकारने अद्याप व्यवस्था केलेली नसली तरी राजकीय पक्षांच्या मदतीने कोल्हापूरचे ६५ विद्यार्थी आणि जळगावचे ४४ विद्यार्थी चार बसमधून रवाना झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जळगाव येथील विद्यार्थ्यांसाठी दोन एसटी बसची व्यवस्था केली होती. त्यासाठी ७० हजार रुपये जमा केले होते. रविवारी दुपारी १२च्या सुमारास स्वारगेट बसस्थानकातून ४४ विद्यार्थी बसने रवाना झाले, सोमवारी मनविसेतर्फे नगर आणि नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी दोन बस सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी ३० हजार रुपये एसटीकडे जमा केले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्य सरकार विद्यार्थ्यांची व्यवस्था करणार नसेल तर मनसे त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले. 

प्रत्येकाच्या 'डीपी'वर झळकतायत महाराष्ट्र पोलिस; काय आहे कारण?

भाजपने राबविलेल्या 'घर चलो अभियाना'अंतर्गत कोल्हापूच्या विद्यार्थ्यांसाठी दोन खासगी बससे सोडल्या. स्वारगेट येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आदी उपस्थित होते. या दोन बस मधील ६५ विद्यार्थ्यांना सॅनिटाइजर, मास्क, पाण्याची बाटल, जेवण सोबत देण्यात आले आहे. , इतर शहरांसाठीही नियोजन सुरु आहे. 

कोरोनाग्रस्तांवर उपचार करून घरी परतली नर्स; पतीने केले अशाप्रकारे स्वागत...
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: with the help of political parties 65 students from Kolhapur and 44 students from Jalgaon left in four buses from pune