Gokul Milk : 'गोकुळ'च पॅकिंग बदलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gokul Milk : 'गोकुळ'च पॅकिंग बदलणार

Gokul Milk : 'गोकुळ'च पॅकिंग बदलणार

पुणे : दुधामध्ये होणारी भेसळ रोखून ग्राहकांपर्यंत उत्तम दर्जाचं आणि शुद्ध दूध पोहोचविण्यासाठी आता 'गोकूळ'चे दूध अधिक सुरक्षित पॅकिंगमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय गोकूळ दूध संघाने घेतला आहे. या नव्या पॅकिंगचं वैशिष्ट्य म्हणजे दुधात भेसळ करण्याचा प्रयत्न झाला असेल, तर ते पॅकिंगवरून ग्राहकांना सहज लक्षात येऊ शकणार आहे. मात्र ग्राहकांना भेसळमुक्त दूध देण्यासाठी 'गोकूळ'ने पॅकिंग बदलली दुधाच्या विक्री दर जैसे थे कायम राहणार आहेत.

हेही वाचा: पंजाब, राजस्थानप्रमाणं राज्यात करा इंधन कर कपात; काँग्रेसची मागणी

गोकूळचे दूध आतापर्यंत पॉलिपिक पिशवीतून वितरित होत असे. ही पिशवी तीन पडद्याची असे. त्यामुळे त्यात भेसळ करणे शक्य होत होते. पण आता त्यात बदल करून आता ते पाच पडद्याच्या पिशवीतून ग्राहकांपर्यंत पोचविले जाणार आहे. यामुळे एकदा दूध पॅक झालं की, त्यात भेसळ करणं अशक्य होईल. तरीही कोणी तसा प्रयत्न केला, तरी वैशिष्ट्यपूर्ण पॅकिंगमुळे ग्राहकांनाच ते सहज लक्षात येऊ शकणार आहे.

गोकूळ या नावाची विश्वासार्हता खूप मोठी आहे. गोकूळने दूध वितरण सुरू केलं, तेव्हापासून आतापर्यंत ग्राहकांना दर्जेदार दूध उत्पादन देण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. याच प्रयत्नांतूनच ग्राहकांना भेसळमुक्त दूध देण्यासाठी 'गोकूळ'चे पॅकिंग अधिक सुरक्षित करण्याचा निर्णय घेतल्याचे या दूध संघाचे संचालक विश्‍वास पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

ग्राहकांनी दुधाची भेसळ कशी ओळखावी?

गोकूळ दूध संघाकडून फुलक्रिम दुधासाठी सी.आय. या अत्याधुनिक छपाई तंत्रज्ञानाची पाच पडद्याची सिक्युरीटी फिल्म वापरली जात आहे. अधिक सुरक्षितता म्हणून या फिल्मवर बारीक अक्षरात छपाई करून आतील भागात निळ्या रंगाच्या फिल्मचा थर दिलेला आहे. त्यामुळे जर कुणी भेसळ करण्याचा प्रयत्न केल्यास सील केलेल्या जागी काळसर ठिपका दिसेल. पर्यायाने ग्राहकांना दुधातील भेसळ ओळखता येईल, असे विश्‍वास पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top