Hoarding : होर्डिंग वादग्रस्त, तरीही परवाना देण्याचा घाट

संभाजी पोलिस चौकीच्या मागे नदी पात्राला लागून असलेल्या जागेत नियमांचे उल्लंघन करून होर्डिंग उभारण्यात आल्याचा प्रकार समोर.
Digital Hoarding
Digital Hoardingsakal

पुणे - संभाजी पोलिस चौकीच्या मागे नदी पात्राला लागून असलेल्या जागेत नियमांचे उल्लंघन करून होर्डिंग उभारण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून संबंधित व्यावसायिकाला पायघड्या घातल्या जात आहेत. ही जागा महापालिकेची असूनही जागा वाटप नियमावलीनुसार प्रस्ताव न मागविता संबंधित व्यावसायिकाला ११ महिन्यासाठी जागा भाड्याने देण्याचा खटाटोप सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे तीन होर्डिंग उभे करण्यात आले आहेत. हे होर्डिंग उभे करताना दोन होर्डिंगमध्ये प्रत्येकी एक मीटरचे अंतर न सोडणे, राडारोडा टाकणे, झाडे तोडणे असे प्रकार करण्यात आलेत. नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर होर्डिंगच्या कामाला स्थगिती देण्यात आली.

तसेच जाहिरात प्रसिद्धीवर बंदी आणली आहे. या प्रकरणात कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित ही करण्यात आले होते. पण या होर्डिंगचा परवाना रद्द करूनही लोखंडी सांगडा महापालिकेने काढून टाकला नाही.

याच दरम्यान आता ही जागा खासगी मालकीची असल्याचा दावा होर्डिंग व्यावसायिकाने केला होता, पण महापालिकेच्या तपासणीमध्ये ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. तरीही क्षेत्रीय कार्यालयाकडून संबंधित होर्डिंग व्यावसायिकास ११ महिने मुदतीने जागा भाड्याने देण्याचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्याची हालचाल सुरु करण्यात आली आहे.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, ‘अद्याप आमच्याकडे याचा प्रस्ताव आलेला नाही. सर्व गोष्टी नियमात बसल्याशिवाय होर्डिंगला परवानगी दिली जाणार नाही.

लिलाव न करता जागा वाटप?

महापालिकेची जागा भाड्याने देताना जागा वाटप नियमावलीनुसार लिलाव करणे आवश्‍यक आहे. जो निविदाधारक जास्त भाडे महापालिकेला देईल त्यास जागा देणे आवश्‍यक आहे. पण या प्रक्रियेलाही फाटा मारण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com