पथारी व्यावसायिकही होणार ‘आत्मनिर्भर’; कसे ते वाचा

Hockers
Hockers

पुणे - चार महिन्यांहून अधिक काळ वाट पाहिल्यानंतर अखेर पथारी व्यावसायिकांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्राने ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना’ लागू करण्याचा आदेश दिला आहे. या योजनेंतर्गत पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी १० हजार रुपये भागभांडवल कर्ज रूपाने मिळणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हातावर पोट असणाऱ्या पथारी व्यावसायिकांना लॉकडाउनचा सर्वाधिक फटका बसला. अनेकांची कुटुंब उद्‌ध्वस्त होण्याची वेळ आली. त्याची दखल घेत केंद्र सरकारने मध्यंतरी पथारी-हातगाडी व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी १० हजार रुपयांचे भांडवल देणार असल्याची घोषणा केली होती. त्याला चार महिन्यांहून अधिक कालावधी होऊन गेला तरीही मदत मिळाली नव्हती. ती कधी आणि कशी मिळणार?, याची माहितीही पथारी व्यावसायिकांना नव्हती. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी व्याजाने तर कोणी दागिने मोडून पुन्हा व्यवसायाला सुरूवात केली. असे असताना अखेर ही योजना केंद्राने लागू केली आहे.

केंद्राने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत १० हजारांचे भागभांडवल कर्ज रूपाने उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी पुणे महापालिकेची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. पथारी व्यावसायिकांनी आवश्‍यक त्या कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. पथारी व्यावसायिकाचे सर्वेक्षण झाले नसेल, अथवा परवाना मिळाला नसेल, तर त्यांना शिफारस पत्र देण्याची जबाबदारी महापालिकेवर टाकली आहे.

केंद्र सरकारने ही योजना लागू केली असली तरी त्याबाबतची पुरेशी माहिती मिळालेली नाही. पैसे देणार असाल तर व्याज आकारू नये. सध्या तरी व्याज भरण्याची आर्थिक परिस्थिती नाही आहे. तसेच, कर्जासाठी कागदपत्रे द्यावी लागणार आहे. त्यात सवलत द्यावी.
- संदीप यादव, पथारी व्यावसायिक, सदाशिव पेठ

आवश्‍यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • बॅंकेचे पासबुक, पॅनकार्ड, रेशनकार्ड
  • पुणे महापालिका प्रमाणपत्र अथवा पथविक्रेता सर्वेक्षणाचा एसआरव्ही क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com