esakal | बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी विधेयकाची होळी 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati1.jpg

कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे असून, ते मान्य नाही, असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज बारामतीत कृषी विधेयकाची होळी केली. 

बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी विधेयकाची होळी 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे असून, ते मान्य नाही, असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज बारामतीत कृषी विधेयकाची होळी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी बारामतीत या विधेयकाची होळी केली. या वेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास बाबर, युवा जिल्हा सचिव राजेंद्र सपकळ, संभाजी ब्रिगेडचे इंदापूर तालुकाध्यक्ष सचिन अनपट, गजानन चव्हाण आदी उपस्थित होते. 

Video : अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

अस्मानी संकट, कोरोनाची आपत्ती, उत्पादनखर्चाहून कमी मिळणारा भाव, अशा विविध समस्यांनी शेतकरी अगोदरच खचून गेला आहे, अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या मुळावरच या विधेयकाच्या माध्यमातून घाव घालण्याचा डाव केंद्राने आखल्याची टीका या वेळी केली गेली. या वेळी या विधेयकाची होळी करत केंद्राच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. हे विधेयक कोणत्याही परिस्थिती अमलात येऊ देणार नाही, असा इशाराही देण्यात आला.