तक्रारीकरिता पोलिस नियंत्रण कक्षात केलेला कॉल थेट दस्तूरखुद्द गृहमंत्री उचलतात अन्...

तक्रारीकरिता पोलिस नियंत्रण कक्षात केलेला कॉल थेट दस्तूरखुद्द गृहमंत्री उचलतात अन्...

पुणे : सगळ्यांना वेध लागतात ते थर्टी फर्स्ट मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे, पण पोलिस मात्र "थर्टी फर्स्ट'ची रात्र शांततेत पार पडावी, यासाठी सायंकाळपासूनच रस्त्यावर कडेकोड बंदोबस्त देत उभे असतात. नागरीकांचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या याच पोलिसांना खंबीर मानसिक आधार देण्यासाठी गुरूवारी दस्तुरखुद्द गृहमंत्र्यांनीच पोलिस नियंत्रण कक्षात हजेरी लावली.

रस्त्यावर बंदोबस्त करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी "कोरोना काळातील कामाने तुम्ही नक्की थकला आहात, पण तुम्ही हिमतीने काम केले. यापुढे याच हिमतीने एकत्र लढत राहू आणि कोरोनामुक्त महाराष्ट्र करु," अशा शब्दात पोलिसांना भक्कम विश्वास दिला!

त्याचं झालं असं की गृहमंत्री अनिल देशमुख काल रात्री पुणे पोलिस आयुक्तालयात आले होते. कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी केक कापत नववर्षाचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी वायरलेसवरुनही कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत शुभेच्छा दिल्या. 

नियंत्रण कक्षात जाऊन स्वतः काही कॉल घेतले. यामध्ये एका नागरिकाने सोसायटी परिसरात मोठ्याने गाणी वाजत असल्याची तक्रार केली असता; तो फोन स्वत:हा गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच घेतला. 

त्यांना आपली तक्रार जवळच्या पोलिस स्टेशनला सांगतो असं कळवलं. थेट गृहमंत्र्यांशी संवाद झाल्याने या पुणेकरालाही आश्चर्याचा धक्का बसला. सिंहगड रोडवरील सनसिटी परिसरात राहणाऱ्या इंद्रनील हात्ते या नागरिकाचा हा कॉल होता.

(संपादन : सागर डी. शेलार) 

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com