पिंपरीत हॉटेल व्यावसायिकाला चौघांकडून मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

पिंपरी : हॉटेलमध्ये आलेल्या चौघांनी रूमबाबत विचारणा केली असता त्यांना थोडे थांबण्यास सांगितल्याचा राग आल्याने हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना पिंपरीतील नेहरूनगरमध्ये घडली. 

मुंबई-पुणे मार्गावर धावणार पहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस

श्रीधर भोजा शेट्टी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय धनाजी, सागर नामदेव तांदळे (दोघेही रा. नेहरूनगर), धनराज भाऊसाहेब ठाकूर (रा. पिंपरीगाव) व एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे. शेट्टी यांचे नेहरूनगर येथे न्यू टेल्को रस्त्यावर हॉटेल आहे. बुधवारी (ता. 12) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास आरोपी त्यांच्या हॉटेलमध्ये आले.

डीएसके यांच्या सहा वाहनांचा लिलाव; 'या' वाहनाला मिळाली सर्वाधिक किंमत

"आम्हाला रूम पाहिजे' असे त्यांनी विचारले. त्यावर "तुम्ही थोडे थांबा, मी कामगार मुलाला बोलवतो' असे शेट्टी यांनी त्यांना सांगितले. त्या वेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पुणे महापालिकेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूष करण्यासाठी काय घेतला निर्णय

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hotel businessman beaten up by Four in Pimpri