esakal | नोकरदारांना किती दिवस घरी बसविणार? : हर्षा शहा
sakal

बोलून बातमी शोधा

नोकरदारांना किती दिवस घरी बसविणार? : हर्षा शहा

दौंड-पुणे दरम्यान २२ मार्चपासून शटल, डिएमयू व पॅसेंजर सेवा बंद असल्याने दौंड, हवेली, बारामती, शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातून पुण्याकडे जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

नोकरदारांना किती दिवस घरी बसविणार? : हर्षा शहा

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यातून रेल्वेने पुण्याला जाणाऱ्या  नोकरदार, व्यावसायिक आणि छोटे व्यापारी गेली सात महिने घरी बसून आहेत, त्यांना आणखी किती दिवस घरी बसवायचे?, हे शासनाने ठरवावे. वाढती बेरोजगारी व वाढत्या खर्चांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने दैनंदिन प्रवाशांसाठी दौंड-पुणे-दौंड डिझेल मल्टिपल यूनिट (डिएमयू) सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या चेअरमन हर्षा शहा यांनी केली आहे. 

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

दौंड-पुणे दरम्यान २२ मार्चपासून शटल, डिएमयू व पॅसेंजर सेवा बंद असल्याने दौंड, हवेली, बारामती, शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातून पुण्याकडे जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

दौंड-पुणे दरम्यानच्या पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरूळी कांचन, लोणी काळभोर, मांजरी व हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे आणि पुण्यातून लोकल मार्गे पिंपरी ते लोणावळापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. 

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता डिएमयू सेवा २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा करून कोणतेही सबळ कारण न देता ती रद्द करण्यात आली. दौंड ते पुणे दरम्यान एसटी सेवा सुरू आहे पण रेल्वे मासिक व त्रैमासिक पासच्या तुलनेत ती खर्चिक आणि जास्त वेळ घेणारी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रत्येक प्रवाशाला आपल्या जीवाची काळजी असल्याने सेवा सुरू झाल्यास शारीरिक अंतराचे पालन करण्यासह तोंडाला मास्क घातला जाईल. सर्व प्रवाशांसाठी दैनंदिन प्रवासी गाड्या सुरू करून नोकरदार व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा, अशी मागणी हर्षा शहा यांनी केली.

(संपादन : सागर डी. शेलार)