

"अभ्यासाचं टेन्शन विसरा, जेवणाची काळजी 'एक हात मदतीचा' घेईल!" पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजनाची सोय; वास्तव कट्टाची सामाजिक बांधिलकी.
Sakal
पुणे: पुण्यनगरी ही हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचे शहर आहे. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका थेट विद्यार्थ्यांच्या पोटाला बसला आहे. अनेक मेस बंद झाल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. अशा कठीण प्रसंगी ‘इग्नाइट अकॅडेमी’ आणि ‘वास्तव कट्टा’ या संस्थांनी मदतीचा हात पुढे केला असून, त्यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाचा १०वा दिवस यशस्वीपणे संपन्न झाला.