

Heavy monsoon rainfall has significantly improved reservoir storage across Maharashtra
sakal
पुणे: जुलैमध्ये समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा २२ वरून थेट ५६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, या वाढीचा लाभ राज्यातील सर्व भागांना समान मिळालेला नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील धरणे भरत असताना मराठवाडा आणि विदर्भातील अनेक महत्त्वाच्या धरणांमध्ये अद्यापही अत्यल्प किंवा शून्य पाणीसाठा असल्याने जलव्यवस्थापनाचे आव्हान कायम आहे.