ना सोशल डिस्टन्स, ना कसली भीती; कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

समाजकल्याण विभागाकडून पदवी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या अर्जावर संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची सही व शिक्का गरजेचा असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात यावे लागत आहे.

पुणे : पदवी प्रवेश, शिष्यवृत्तीचे अर्ज जमा करताना त्यासोबत कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडाव्या लागत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांची झेरॉक्स दुकानांवर मोठी गर्दी होत असून, तेथे न सोशल डिस्टन्स ना कोरोनाची भीती असे चित्र मध्यवर्ती भागातील महाविद्यालय परिसरात दिसून येत आहे. 

'कोरोना' संक्रमणात पुणे देशात सर्वात पुढे असताना त्यात लागन होण्यामध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. संकट अद्याप टळलेले नसतानाही तरुणाई मात्र एकदम बेफिकीरपणे शहरात मुक्तसंचार करत आहे. 

आता अत्याचार पीडित बालकांना मिळणार जलद न्याय; वाचा सविस्तर!​

इयत्ता बारावीच्या निकालानंतर यातील बहुतांश महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली. त्यावर गुणपत्रिका टीसी, जात प्रमाणपत्र यासह इतर कागदपत्र ऑनलाइन अपलोड करता येणे शक्य आहे. विद्यार्थी घरबसल्या याच पद्धतीने स्वतःचे प्रवेश निश्चित करत आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येत नसल्याने त्यांना महाविद्यालयात येऊन कागदपत्रे जमा करण्यास सांगितले जात आहे. तसेच समाजकल्याण विभागाकडून पदवी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या अर्जावर संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची सही व शिक्का गरजेचा असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात यावे लागत आहे.

व्हॉट्सऍपद्वारे धोकादायक वीजयंत्रणेच्या 'इतक्या' तक्रारी दाखल; महावितरणचा नवा उपक्रम​

बरेच विद्यार्थी मित्र-मैत्रिणींसोबत घोळक्याने महाविद्यालयात येत आहेत, कागदपत्रांच्या प्रिंट काढण्यासाठी दुकानांवर जात आहेत. मध्यवस्तीतील एका महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊच नये असा आमचा प्रयत्न आहे, पण ऑनलाईन अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी आणि समाजकल्याणच्या शिष्यवृत्तीच्या अर्जावर प्राचार्यांचा शिक्का यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात येत आहेत. त्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे यासाठी सूचना दिल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

फुफ्फुसाची कार्यक्षमता ५ टक्के अन् ऑक्सिजनची पातळी ७५; तरीही त्याने कोरोनावर केली मात!​

"विद्यार्थ्यांनी घोळका करून थांबू नये, असे आम्ही सांगतो. पण काहीजण ऐकत नाहीत. दुकानात कोणालाही प्रवेश दिला जात नाही, असे झेरॉक्स सेंटर चालकाने सांगितले. 

स्टॉलवरही गर्दी
शहर अनलॉक झाल्याने चहाचे स्टॉल, खाद्यपदार्थांची दुकाने उघडली आहेत. मात्र,कोरोनाची स्थिती गंभीर असतानाही ग्राहक नियमांचे पालन न करता मोठी गर्दी करत आहेत. यामध्ये बहुतांश महाविद्यालयीन तरुण असल्याचे दिसून येत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Huge crowd of students at Xerox shops for Xerox of documents