पुण्यात पुठ्याच्या गोडाऊनमध्ये मध्यरात्री भीषण आग

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

पुण्यातील हडपसर गाव राम मंदिर जवळील पुठ्ठ्याच्या गोडाऊनमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी तात्काळ आगीवर निंयत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले. पण, गोडाऊनमध्ये कागद आणि पुठ्ठे असल्याने आग मोठ्या प्रमाणात परसत होती.

पुणे  : पुण्यातील हडपसर परिसरातील एका गोडाऊनमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली आहे. या गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी अख्खं गोडाऊन होते. आगीचे रोद्ररुप पाहून परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील हडपसर गाव राम मंदिर जवळील पुठ्ठ्याच्या गोडाऊनमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी तात्काळ आगीवर निंयत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले. पण, गोडाऊनमध्ये कागद आणि पुठ्ठे असल्याने आग मोठ्या प्रमाणात परसत होती.

अखेर पुणे विद्यापीठाचं ठरलं; बॅकलॉगची परीक्षाही होणार ऑनलाइन!

दरम्यान, तासभर प्रयत्न केल्यानंतर आग ओटोक्यात आली. पुठ्यामुळे आग वेगात पसरली आणि परिसरात धुराचे लोठ उठले होते तर आगीच्या ज्वाळा दुरपर्यंत दिसत होत्या. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. 

महत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A huge fire broke out at midnight in a cardboard godown in Pune