esakal | ...आणि पोलिस ठाण्याबाहेरच तो पत्नीला म्हणाला, 'तलाक, तलाक, तलाक!'
sakal

बोलून बातमी शोधा

Talaq

फिर्यादी महिला आणि रेहान शेख यांचा 2015 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी फिर्यादी यांना सासूने शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

...आणि पोलिस ठाण्याबाहेरच तो पत्नीला म्हणाला, 'तलाक, तलाक, तलाक!'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पत्नीला मूल होत नसल्याच्या कारणावरून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीला पोलिस ठाण्याच्या बाहेरच तिहेरी तलाक पद्धतीने तलाक दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मात्र तोंडी तलाक देणाऱ्या या नवऱ्यासह सासूविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात तत्काळ 'मुस्लिम महिला कायदा 2019' नुसार गुन्हा दाखल झाला. 

Bihar Election: सत्ता कुणाचीही असो, बिहारमध्ये 'जंगलराज'च!​

रेहान इलियास शेख, फरिदा इलियास शेख (दोघेही रा. भाग्योदयनगर, कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ऍड. साजिद शहा यांच्या मदतीने विवाहितेनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि रेहान शेख यांचा 2015 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी फिर्यादी यांना सासूने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. पती काम करत नसल्यामुळे फिर्यादी या मेहंदी काढण्याचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. त्यातही तिला मिळालेले पैसे पती हिसकावून घेत तिरा मारहाण करीत होता. फिर्यादीने काम करून साठविलेले पाच लाख रुपयेही पतीने खर्च केले. 

'तेलही गेले अन् तूपही गेले'; दीड लाखाच्या 'आयफोन' पायी गमावले सव्वा सात लाख!

दरम्यान, पतीने फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेण्याबरोबर मूल होत नसल्याबद्दल पत्नीलाच दोष देण्यास, शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली. फिर्यादीला मारहाण करून ते तिच्या आई-वडिलांनाही धमकावीत होते. याप्रकरणी फिर्यादीने 2017 मध्ये फिर्याद दिली होती. दरम्यान, पती एका महिलेसमवेत मोबाईलवर अश्‍लील चॅटिंग करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादीने त्याला जाब विचारला. त्यावेळी त्याने तिला जबर मारहाण करीत तिहेरी तलाक देण्याची धमकी दिली.

त्यानंतर फिर्यादीने तिच्या माहेरहून 10 लाख रुपये आणावे, यासाठी तिला घरातून हाकलून देण्यात आले. त्याबाबतची तक्रार देण्यासाठी फिर्यादी पोलिस ठाण्यात गेली होती. त्यावेळी पतीने तेथे जाऊन तिला शिवीगाळ करीत तिहेरी तलाक दिल्याचा उच्चार करीत तो निघून गेला. या प्रकरणानंतर तिने पती आणि सासूविरुद्ध कौटुंबिक छळ, धमकावणे, संगनमत करून मारहाण करणे तसेच मुस्लीम महिला कायदा 2019 नुसार गुन्हा दाखल केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image