esakal | अनोख्या स्टाईलने घेतले पत्नीचे नाव; कपलची सोशल मीडियात जोरदार चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

अनोख्या स्टाईलने घेतले पत्नीचे नाव; कपलची सोशल मीडियात जोरदार चर्चा

अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील बाजीराव बबन टेमकर या बैलगाडाप्रेमी तरुणाने त्याच्या लग्नात पत्नीचे नाव घेताना उखाण्या ऐवजी चक्क बैलगाडाघाटात बैलगाडा पुकारतात त्या स्टाईलने पत्नीचे नाव घेऊन उपस्थितांची मने जिंकली.

अनोख्या स्टाईलने घेतले पत्नीचे नाव; कपलची सोशल मीडियात जोरदार चर्चा

sakal_logo
By
सुदाम बिडकर

पारगाव : बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्य न्यायालयाची बंदी आल्यानंतर सुमारे सात वर्षापासून बैलगाडा शर्यत बंद असूनही बैलगाडाप्रेमी तसेच हौशी शेतकऱ्यांचे बैलगाड्यावरील तसेच बैलांवरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील बाजीराव बबन टेमकर या बैलगाडाप्रेमी तरुणाने त्याच्या लग्नात पत्नीचे नाव घेताना उखाण्याऐवजी चक्क बैलगाडाघाटात बैलगाडा पुकारतात त्या स्टाईलने पत्नीचे नाव घेऊन उपस्थितांची मने जिंकली.

शहीद जवान सुजित किर्दत, नागनाथ लोभे यांना पुणे विमानतळावर लष्कराकडून सलामी

दरम्यान, त्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात हजारो जणांच्या मोबाईलवर झळकला काहींनी तो स्टेटस्ला ठेवला तर काहींनी फेसबुक तसेच इंन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.

न्यायालयाच्या बंदीमुळे सुमारे सात वर्षापासून बैलगाडा शर्यत बंद आहे. तरीही उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी हौशेने शर्यतीचे बैल गोठ्यामध्ये जोपासले आहेत. बैलगाडा शयर्तीवरील त्यांचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. बैलगाडा शर्यत म्हटली की, शेतकरी तहान भुक विसरुन या शर्यतीत सहभागी होतात. शर्यतीच्या बैलांवर पोटच्या मुलाप्रमाणे जीवापाड प्रेम करतात. शर्यतीच्या घाटात बैलगाडा जुंपताना समालोचन करणारी व्यक्ती पहाडी आवाजात भिर र र र करत बैलगाडा मालकाचे नाव पुकारत असते.

पुण्यात आलेला गवा कसा गेला, वाचा सविस्तर

बैलगाडा घाटातील समालोचकाचा तो विशीष्ट प्रकारचा आवाज बैलगाडा शर्यतीतील उपस्थितांच्या कानावर पडताच एक वेगळाच उत्साह संचारतो तो आवाज ऐकुन बैलसुध्दा टवकारतात उत्तर पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीमधील समालोचकाची स्टाईल इतकी लोकप्रिय झाली आहे. अनेक निवडणुकांध्ये राजकीय पक्षाच्या उमेदवाराने आपल्या प्रचारामध्ये बैलगाडा शर्यतीमधील स्टाईलचा वापर केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशाच प्रकारे पहाडी आवाजात समालोचन करणाऱ्या बाजीराव टेमकर या बैलगाडाप्रेमी तरुणाचा नुकताच विवाह झाला. विवाहप्रसंगी पत्नी निशाचे नाव घेताना उखाण्याऐवजी शर्यतीच्या घाटातील स्टाईलप्रमाणे पत्नीच्या नावे गाडा पुकारण्याचा आग्रह मित्रांकडून धरला गेला आणी बाजीरावनेही अगदी सहजपणे  भिर र र र करत त्या स्टाईलने नाव घेऊन उपस्थितांची मने जिंकली. आणि तो व्हीडीओ काही वेळातच सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात हजारो जणांच्या मोबाईलवर झळकला. 

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image
go to top