esakal | "मला जगायचं, मला वाचवा", टेम्पो चालकाची आर्त हाक
sakal

बोलून बातमी शोधा

accident

"मला जगायचं, मला वाचवा", टेम्पो चालकाची आर्त हाक

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड (Daund) शहरालगत अष्टविनायक मार्गावर कठडे नसलेल्या पुलावरून टेम्पो खाली कोसळला. परंतु, नशीब बलवत्तर असल्याने पाण्यात बुडालेल्या टेम्पोचा चालक अर्धा तास अडकून देखील वाचला आहे. दौंड - पाटस (daund patas) या अष्टविनायक मार्गावर आज दुपारी हा अपघात झाला. भरधाव वेगात दौंडच्या दिशेने येणार्या टेम्पोचा चालक सिराज शेख (वय २०, रा. कुरकुंभ, ता. दौंड) याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले व तो कठडे नसलेल्या भागीरथी नाल्याच्या पुलावरून थेट नाल्यात कोसळला. (I want live save me tempo driver call)

हेही वाचा: शेतमजुराचा खुन; फरार आरोपी अटकेत

अर्धा टेम्पो पाण्यात बुडाल्याने व त्याचा पाय अडकल्याने त्याला बाहेर पडता येत नव्हते. 'मला जगायचं, मला वाचवा,' असे जीवाच्या आकांताने तो रडत होता. काहींनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास अपयश आले. दौंड पोलिसांच्या पथकाने तातडीने क्रेन मागविला. क्रेनचा पट्टा टेम्पोच्या चासीला बांधल्यानंतर टेम्पो उचलला गेल्यानंतर लगेचच टेम्पो चालक बाहेर आला.

हेही वाचा: पर्यटनासाठी खडकवासल्यापुढे जाण्यास बंदी; पोलिसांचा बंदोबस्त

त्यानंतर क्रेनचा पट्टा तुटल्याने पुन्हा टेम्पो पाण्यात गेला. पोलिसांनी जखमी चालकास दौंड शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या मार्गावरून जात असताना त्यांनी दुरावस्था झालेल्या पुलावर थांबून अपघात आणि अपघातग्रस्ताची माहिती घेतली.

loading image