खंडित आयडिया नेटवर्कमुळे पुणेकर हैराण !

ब्रिजमोहन पाटील
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

- दावा सुपरफास्ट नेटवर्कचा पण फोनच लागेना
​- आयडीयाच्या गचाळ कारभाराने पुणेकर हैराण
- नेटवर्क सुधारणार कधी? सर्वांसमोर प्रश्न

पुणे : आम्हीच सर्वात चांगले मोबाईल नेटवर्क देतो, कोणेही जा आम्ही सोबत असू, आमच्या इंटरनेटला जास्त स्पीड आहे, असा दावा करणाऱ्या आयडीया कंपनीकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात भंगार नेटवर्कमुुळे आज दिवसभर फोन लागतच नव्हते, लागलाच तर एकाच बाजूने आवाज येऊन नुसते ""हॅलो... हॅलो... हॅलो...'' अशी घोकण्याची वेळ आली. या गचाळ कारभारामुळे मेटाकुटीला आलेल्या "स्मार्ट सिटी'तील ग्राहकांनी नेटवर्क सुधारणार कधी? असा प्रश्‍न उपस्थित करत संताप व्यक्त केला.

आयडीया-होडाफोन कंपनीच्या एकत्रीकरणानंतर शहरातील 1 हजार 700 मोबाईल टॉवरच्या इंटीग्रेशनचे काम गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहे. या कामामुळे शहरातून नेटवर्क गायब आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर फुल्ल रेंज दिसत असली तरी प्रत्यक्षात कॉल करतान समोरचा नंबर नॉट रिचेबल आहे असे सांगितले जात आहे. दोन तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर रिंग वाजते, पण समोरच्याचा आवाज येत नाही. त्यामुळे ""हॅलो आवाज येतोय का? हॅलो...'' असे ओरडण्याची वेळ येत आहे. आवाज आला तरी मध्येच तो आवाज तुटत असल्याने संवादात प्रचंड अडथळे येत आहेत. हे दिवसात एकदाच नाही तर प्रत्येक वेळी फोन लावताना पुणेकरांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

सोशल मीडियावर फक्त पुणेकर मोलकरणीची चर्चा​

आयडीचे जनसंपर्क अधिकारी; कंपनीची बेफिकीरी, उत्तरच नाही
आयडीयाच्या टॉवर इंटीग्रेशनचे काम कधी संपणार, ग्राहकांना चांगली सेवा कधी मिळणार हे विचारण्यासाठी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मुकेश खरबंदा यांच्याशी वारंवार संपर्क साधला, त्यावेळी तुम्हाला लवकरच कळवतो विचारून सांगतो अशी उत्तरे दिली. पण त्यांनी ग्राहकांना दिलासा मिळेल असे काहीच सांगितले नसल्याने कंपनीची बेफिकीरी स्पष्ट झाली आहे.

भाजपविरहित सरकार स्थापन होणार; हालचालींना वेग

"गेल्या काही दिवसांपासून आयडीया नेटवर्कला प्रोब्लेम येत आहे. मात्र आज तर फोनच लागत नव्हते, इंटरनेटलाही स्पीड नाही. कंपनीने यामध्ये सुधारणा केली पाहिजे.'' - सारिका शेळके, आयडीया ग्राहक

आयडीया कंपनीचे नेटवर्क खुपच खराब झाले आहे. कॉल ड्रॉप होणे, आवाज न येणे यामुळे व्यवस्थित संवादही साधता येत नाही. हा प्रश्‍न लवकरच मार्गी निघाला पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: idea network issue in Pune area

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: