यूपीतील युवकाची पुण्यात हत्या; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Identification of the dead body found near Katraj tunnel
Identification of the dead body found near Katraj tunnel

कात्रज (ता. ०८) : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कात्रज बोगद्याजवळ एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. हा सर्व प्रकार शनिवारी उघडकीस आला होता. सुरुवातीला पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली नव्हती. मात्र, आता मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाची अंगझडती घेतली असता त्याचा खिशात असलेल्या आधारकार्डवरून त्याचे नाव अजित सिंह असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.

मराठी संशोधकाने दिल्लीतील धुक्याचे उकलले गूढ!

अजित सिंह मूळ सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश)मधील राहणार आहे. सध्या तो खेड शिवापूर, जि. पुणे येथे राहण्यास होता. तो पेंटिंगची कामे करत होता. सदर व्यक्तीने अंगामध्ये निळी जीन्स पॅन्ट, पायात शूज, अंगात लाल शर्ट घातलेला होता. त्याचे कुटुंब उत्तरप्रदेशातच रहायला असून तो व्यवसायिक दृष्टिकोनातून पुण्यात आला होता. त्याचा खून कोणी व का केला याचा तपास लागला नसून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये अज्ञांताविरुद्ध कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गादर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक गंगाधर घावटे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com