ऐका हो ऐका; आधार कार्ड लिंक न केल्‍यास होणार रेशन बंद!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

लाभार्थ्‍यांनी रेशनकार्डमध्‍ये नोंद असलेल्‍या कुटुंबातील सर्व सदस्‍यांचे आधारकार्ड घेऊन संबंधित रास्‍तभाव धान्‍य दुकानात जाऊन केवायसी पडताळणी पूर्ण करुन घ्‍यावी.

पुणे : रेशनकार्ड धारकांनी येत्या 31 जानेवारीपर्यंत रेशन कार्डला आधार क्रमांक लिंक करुन घेणे बंधनकारक असून, आधार लिंकिंग न झाल्यास लाभार्थ्‍यांना पुढील महिन्‍यापासून धान्‍य मिळणार नाही, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली. राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजना आणि अंत्‍योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकेतील लाभार्थ्‍यांचे मोबाईल क्रमांक आणि आधार लिंक पूर्ण करण्‍याच्‍या केंद्र सरकारच्‍या सूचना आहेत. 

व्यवस्थापनशास्त्रातील आधारस्तंभ हरपला; डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचे पुण्यात निधन​

सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेत अधिक पारदर्शकता येण्‍यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्‍यांचे आधार, मोबाईल लिंक करणे आवश्‍यक आहे. याकरीता रास्‍तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ई-केवायसी आणि मोबाईल लिंकिंग सुविधेचा वापर करुन आधार आणि मोबाईल क्रमांक लिंकचे प्रमाण वाढविणे आवश्‍यक आहे. याकरित 31 जानेवारीपूर्वी प्रत्‍येक रेशनकार्डमधील लाभार्थ्‍यांचे शंभर टक्के आधार लिंकिंग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक देण्‍याच्‍या उद्दीष्‍टाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 11 परिमंडळ कार्यालयात मोहिम राबविण्यात येत आहे. त्‍याअनुषंगाने धान्‍याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाव्‍दारे रास्‍तभाव दुकानदार यांच्‍यामार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्‍यांच्‍या आधार व मोबाईल क्रमांक लिंक करण्‍यात येणार आहे.

पुणे झेडपी सदस्याची धडाकेबाज बॅटिंग; तरुणांमध्ये जोरदार चर्चा!​

याबाबत आधार लिंक न झालेल्‍या लाभार्थ्‍यांची रास्‍तभाव दुकाननिहाय यादी तयार करण्यात आली आहे. 31 जानेवारीपूर्वी या लाभार्थ्‍यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक करण्‍याचे निर्देश 11 परिमंडळ कार्यालयांना देणेत आले आहेत.

केवायसी पडताळणी व मोबाईल लिंक सुविधा प्रत्‍येक रास्‍तभाव धान्‍य दुकानात आणि संबंधित परिमंडळ कार्यालयात उपलब्‍ध आहे. याबाबत सर्व परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांच्यामार्फत रास्‍तभाव दुकानदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

यंदा महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा होणार; पण...​

लाभार्थ्‍यांनी रेशनकार्डमध्‍ये नोंद असलेल्‍या कुटुंबातील सर्व सदस्‍यांचे आधारकार्ड घेऊन संबंधित रास्‍तभाव धान्‍य दुकानात जाऊन केवायसी पडताळणी पूर्ण करुन घ्‍यावी. याकरिता संबंधित लाभार्थी यांनी वैयक्तिकरित्‍या दुकानात जाऊन आधारकार्ड व अंगठयाचा ठसा ई-पॉस मशिनवर द्यावयाचा आहे. कुटुंबातील किमान एका सदस्‍याचा मोबाईल क्रमांक देणे आवश्‍यक आहे, असे अन्नधान्य वितरण अधिकारी मोरे यांनी सांगितले.

राष्‍ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि अंत्‍योदय योजनेचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 13 लाख 32 हजार 871 लाभार्थी आहेत. त्यापैकी 10 लाख 61 हजार 822 (79.66 टक्के) इतक्‍या लाभार्थ्‍यांचे आधार लिंक झालेले आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Aadhar card is not linked to ration card then beneficiaries will not get foodgrains from next month