व्यवस्थापनशास्त्रातील आधारस्तंभ हरपला; डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचे पुण्यात निधन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

पुण्यात 'बी.कॉम.'चा अभ्यासक्रम आज मराठी भाषेतून शिकवला जातो, उत्तरपत्रिकासुद्धा मराठी भाषेमधून लिहिता येते, हे सारे डॉ. शेजवलकर यांच्या प्रयत्नांतूनच साध्य झाले.

पुणे : वाणिज्य, व्यवस्थापन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्रात अगदी सहजपणे मुसाफिरी करणारे ज्येष्ठ शिक्षण आणि व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचे वृद्धपकाळाने पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे.

पुण्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग; पाहा कोठे कोठे झाला पाऊस

प्रभाकर चिंतामण शेजवलकर ऊर्फ डॉ. प्र. चिं. शेजवलकर हे मराठी लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि व्यवस्थापनतज्ज्ञ होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि २०१२ मध्ये अध्यक्षपद त्यांनी भूषविले. डॉ. शेजवलकर वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बॅंक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत सहजपणे मुसाफिरी करत. त्यांनी विद्यापीठाच्या स्तरावर सुमारे ६० वर्षे अध्यापन केले. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे ते प्रमुख होते. त्यांच्या हाताखाली जवळपास ८०हून अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. काही व्यवस्थापन संस्थांचे प्रमुख संचालकपद त्यांनी अखंडपणे भूषविले. पुणे विद्यापीठाच्या 'नॉलेज मॅनेजमेंट' या अभ्यासमंडळाचे ते अध्यक्ष होते. पुणे स्टॉक एक्स्चेंजचे ते संचालकही होते.

एका पावसात हवेचं प्रदूषण आलं निम्म्यावर; मुंबईच्या तुलनेत पुणे ठरलं वरचढ​

'मराठी ही ज्ञानभाषा व्हावी', यासाठी डॉ. शेजवलकर नेहमीच आपल्या लेखनातून आणि व्याख्यानांमधून पाठपुरावा करत. पुण्यात 'बी.कॉम.'चा अभ्यासक्रम आज मराठी भाषेतून शिकवला जातो, उत्तरपत्रिकासुद्धा मराठी भाषेमधून लिहिता येते, हे सारे डॉ. शेजवलकर यांच्या प्रयत्नांतूनच साध्य झाले. सुमारे ३० पाठ्यपुस्तके त्यांनी मराठीतून लिहिली. त्यांनी चार हजारांहून अधिक भाषणे आणि अध्यात्मावरही विविधांगी लेखन केले आहे.

पुणे झेडपी सदस्याची धडाकेबाज बॅटिंग; तरुणांमध्ये जोरदार चर्चा!​

डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी लिहिलेली काही पुस्तके :
- आठवणीतील माणसं
- उद्योजकांची कर्तृत्वगाथा
- तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी
- नव्या युगाची स्पंदने (संपादित सामाजिक लेख) (गं.बा.सरदार यांचे निवडक लेख)
- भारताचा आर्थिक विकास
- मधुपरीक्षा
- महाराष्ट्राचा आर्थिक विकास
- यशस्वी जीवनाचे रहस्य
- यशस्वी सुखी जीवन
- यशोगाथा (चर्चा पान पहावे)
- विक्रय व्यवसाय आणि जाहिरात कला (सहलेखक मो.स. गोसावी)
- व्यापार संघटन
- सहकारी संस्थांची व्यवस्था व चिटणिसांची कामे
- स्वगत
- स्वातंत्र्याची २५ वर्षे

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr PC Shejwalkar passed away at 92 in Pune