esakal | देशात धरणे, शिपींग पोर्टस उभारण्यासाठी लागते पुण्यातील 'या' संस्थेची परवानगी; इतिहास जाणून घ्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Shipping_Port

तुम्हाला पुण्यातच मुंबई आणि ठाण्याचा कोस्टल एरिया बघायचा असेल तर #CWPRS ला भेट द्या. एका मोठ्या हॅंगरखाली तुम्हाला मुंबईच्या नरिमन पॉइंटसह प्रस्तावित नवी मुंबईतील विमानतळही दिसेल.

देशात धरणे, शिपींग पोर्टस उभारण्यासाठी लागते पुण्यातील 'या' संस्थेची परवानगी; इतिहास जाणून घ्या!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या भाक्रा-नांगल जलसिंचन प्रकल्पापासून मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्टपर्यंत देशातील सगळ्या मोठ्या जलीय प्रकल्पासाठीचे महत्त्वपूर्ण संशोधन पुण्यात होते. खडकवासला स्थित केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्था (CWPRS) ही जगातील सर्वांत जुनी आणि नावाजलेल्या अगदी मोजक्‍याच तीन जलीय संशोधन संस्थांपैकी एक आहे. नुकतेच या संस्थेने 104 वर्ष पूर्ण केली आहे. संस्थेचे कर्मचारी जब्बार शेख, शास्त्रज्ञ महेंद्रकुमार पवार आणि अभियंता सतीश कुलकर्णी यांच्या सहकार्याने संस्थेचा घेतलेला हा आढावा... 

जय शिवराय : राजगडावरील दुरुस्तीचे काम सुरू, पुरातत्व विभागाने घेतली दखल 

पुण्याच्या दक्षिण-उत्तरेला 14 किलोमीटर प्रवास करत गेलात तर तुम्हाला खडकवासला धरणाच्या पायथ्याशी विस्तीर्ण जागेत पसरलेली ही संस्था दिसेल. गर्द झाडांमध्ये तुम्हाला देशासह दक्षिण आशियातील अनेक धरणे, ब्रीज, विद्युत प्रकल्प, पोर्टची प्रत्यक्ष मॉडेल दिसतील. सध्या संस्थेच्या संचालक म्हणून डॉ. वर्षा भोसेकर कार्यरत आहेत. बॉम्बे प्रेसिडेंसीत 1916 मध्ये सुरू झालेला "विशेष सिंचन कक्ष' आज "केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्थे'च्या नावाने ओळखला जात आहे. संस्थेच्या नावाबरोबरच तिचे कार्यक्षेत्र आणि संशोधनाची व्याप्तीही वाढत गेली.

नदी आणि समुद्राशी निगडित प्रमुख सात विभागांमध्ये इथे संशोधन आणि विकासाची कामे चालतात. नदी अभियांत्रिकी, नदी आणि जलसाठा सिस्टिम मॉडेलिंग, किनारे आणि खाडी नियोजन, फाउंडेशन ऍण्ड स्ट्रक्‍चर, ऍप्लाइड अर्थ सायन्सेस, जलसाठा आणि तंत्र रचना, इंन्स्ट्रूमेंटेशन कॅलिब्रेशन ऍन्ड टेस्टिंग सेंटर अशी सात डिसिप्लीनमध्ये काम चालते. भारतासह नेपाळ, अफगाणिस्तान, इराण, इराक सह दक्षिण आशियातील महत्वपूर्ण जल सिंचन आणि कोस्टल प्रोजेक्ट येथे अभ्यासले जातात.

- वीजबिलांबाबत महावितरणने काय केला दावा? वीज ग्राहकांनो, वाचा सविस्तर बातमी!

#CWPRS काही निवडक विभागांचा आढावा :

1) बहुउद्देशीय तरंग प्रतिकृती : 
संस्थेतील बहुउद्देशीय तरंग प्रतिकृती हॅंगर सन 2011 मध्ये अस्तित्वात आला. या हॅंगरमध्ये देशातील प्रमुख बंदरे आणि इतर छोटी बंदरे, नवीन येणारी बंदरे, मच्छीमारीसाठी लागणाऱ्या बंदरांची विकास आणि त्यांचे आरेखन ठरवण्याकरता हॅंगरमध्ये भौतिक प्रतिकृती (Physical scaled Model) निर्माण करून कृत्रिमरीत्या समुद्री तरंग निर्माण केल्या जातात आणि संशोधन केले जाते. सध्या शास्त्रज्ञ सुधीर चव्हाण या विभागाचे प्रमुख आहेत. संशोधनानंतर संबंधित अहवाल प्रोजेक्‍ट अथोरिटीला पाठवला जातो.

बहुउद्देशीय तरंग प्रतिकृती 2011 मध्ये बांधून पूर्ण झाली तेव्हापासून या प्रकल्पामध्ये तुतिकोरीन पोर्ट, कांडला पोर्ट, कारवार पोर्ट, कोलाचल मत्स्य बंदर्गाह आणि पुमपुहार मत्य बंदर्गाह (तामिळनाडू), केंबल बे अंदमान निकोबार मोपला बंदरगाह( केरळ) अशा तब्बल 12 प्रोजेक्‍ट्‌स वर संशोधन केले गेले. सद्यःस्थितीत भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यावर महाराष्ट्रातील भगवती बंदर (रत्नागिरी) या बंदरांचा विकास करण्यासाठी संशोधन करावयाचे आहे भगवती बंदर प्रतिकृतीचे बांधकाम मल्टीपर्पज वेव बेसिन हॅंगर (multipurpose wave basin hanger) सुरू आहे. लवकरच भगवती बंदर प्रतिकृतीचे बांधकाम पूर्णत्वास जाईल आणि संशोधन सुरू होईल. संस्थेमधील ही बहुउद्देशीय तरंग प्रतिकृती ही आशिया खंडातीलच नव्हे तर जगातील एकमेव समुद्री तरंग निर्माण करून संशोधन करण्याकरिता केलेली एकमेव सुविधा आहे. 

सलग सोळाव्या दिवशीही इंधन दरवाढीचे मीटर सुसाट

2) मुंबई आणि ठाणे मॉडेल : 
तुम्हाला पुण्यातच मुंबई आणि ठाण्याचा कोस्टल एरिया बघायचा असेल तर #CWPRS ला भेट द्या. एका मोठ्या हॅंगरखाली तुम्हाला मुंबईच्या नरिमन पॉइंटसह प्रस्तावित नवी मुंबईतील विमानतळही दिसेल. मुंबईच्या खाडीत उभी राहणारे ब्रीज, पोर्टस, विमानतळ यांसारख्या कोणत्याही स्थापत्याचा अभ्यास इथे होतो. डॉ. ए.ए. पुरोहित यांच्या नेतृत्त्वामध्ये इथे संशोधन होते. जवाहरलाल नेहरू पोर्ट, नवीन विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर ब्रीज यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे फिजिकल आणि मॅथेमॅटीकल मॉडेल येथे अभ्यासण्यास येत आहे. त्यांचा समुद्रासह किनाऱ्यावरील जीवसृष्टीला आणि पर्यावरणावर होणारे परिणाम येथे हायब्रीड मॉडेलींगने अभ्यासली जातात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

3) नदी पूल अभियांत्रिकी (ब्रीज कंस्ट्रक्‍शन विभाग) 
नाशिकच्या कुंभमेळ्याच्या प्रसंगी धरणांतून पाणी किती सोडायचे यांच नियोजन या विभागातील लोकांनी केलं होते. तसेच नर्मदेवरील सरदार सरोवराचे मॉडेलही याच विभागाने अभ्यासले आहे. शास्त्रज्ञ महेंद्र कुमार पवार यांच्या नेतृत्वात हा विभाग काम करत आहे. नद्यांवरील बांधकामासंबंधीच्या महत्त्वपूर्ण मॉडेल येथे अभ्यासली जातात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप