बिंदुनामावली अद्यायावत केली तरच शाळांना अनुदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

प्राथमिक शिक्षण विभागातर्फे नुकतेच पत्र काढण्यात आले असून त्यामुळे अनुदानित शाळांची ऐन कोरोनाचे संकट डोक्यावर असताना बिंदुनामावली अद्यायावत करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

पुणे, ता. ७ : शाळांनी बिंदु नामावली अद्यायावत केली नसल्यास संबंधित शाळांना अनुदान मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात प्राथमिक शिक्षण विभागातर्फे नुकतेच पत्र काढण्यात आले असून त्यामुळे अनुदानित शाळांची ऐन कोरोनाचे संकट डोक्यावर असताना बिंदुनामावली अद्यायावत करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

राज्यातील शाळांना २० टक्के, ४०टक्के अनुदान देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत बिंदु नामावली अद्यायावत नसल्याने अनुदान वितरित करण्यात अडचणी येत असल्याचे वित्त विभागाने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे शाळांनी बिंदु नामावली अद्यायावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे वाचा - शरद पवारांची पत्रकार परिषद : पुण्यातली मार्केट शिफ्ट करण्याचा पॉझिटिव्ह विचार

राज्यातील अनुदानास पात्र घोषित आणि अनुदानास पात्र असणाऱ्या शाळांची बिंदु नामावली तपासण्यासाठी 'धडक मोहिम कार्यक्रम' प्राथमिक शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यात सर्व विभागातील सर्व जिल्ह्यातील शाळांची बिंदु नामावली पूर्ण करून ती आयुक्त कार्यालयाकडून तपासून घ्यावी, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी पत्राद्वारे दिले आहेत.

शाळांनी बिंदूनामावली भरली असल्यास त्यांना अनुदान वितरण करण्याचा मार्ग मोकळा आहे. परंतु बिंदूनामावली अद्यायावत नसल्यास अनुदान देताना अडचणी येतात. त्यामुळे शाळांना ही माहिती अपडेट करायला सांगितली आहे, अशी माहिती शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी दिली आहे.

हे वाचा - शरद पवारांसारख्या नेत्याला मातोश्रीवर वारंवार जावं लागणं शोभतं का?

राज्यातील शाळांमध्ये कर्मचाऱ्यांची जातनिहाय पदसंख्या, भरलेली पदे आणि रिक्त पदे यांचा तक्ता असतो. त्यानुसार अंमलबजावणी करावी लागते. शाळांमध्ये संंबंधित पदे नियमानुसार भरली नसतील तर बिंदु नामावली होत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if roaster not updated grant will not approve to school