esakal | 'आयसर'मध्ये होणार आता दररोज 500 कोरोना चाचण्या
sakal

बोलून बातमी शोधा

corona test.jpg

नवीन उपकरणांमुळे "आयसर'ची दररोजची चाचण्यांची क्षमता 250 वरून 500 पर्यंत वाढणार आहे.

'आयसर'मध्ये होणार आता दररोज 500 कोरोना चाचण्या

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : "आयसीआयसीआय लोम्बार्ड'ने पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेला (आयसर) कोविड-19 च्या चाचण्यांची क्षमता आणि वेळ वाचविण्यासाठी आवश्‍यक असलेले अतिरिक्त आरटी-पीसीआर ( रिव्हर्स ट्रान्सस्क्रिप्ट्‌स पॉलिमर्स चेन रिऍक्‍शन) यंत्राची संख्या वाढविण्यासाठी वीस लाख रुपयांची मदत दिली आहे. नवीन उपकरणांमुळे "आयसर'ची दररोजची चाचण्यांची क्षमता 250 वरून 500 पर्यंत वाढणार आहे.

'आरटीई'च्या राखीव जागांवरील प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत    


"आयसर'ने पुण्यात 21 मे रोजी कोविड-19 च्या चाचण्यांसाठी केंद्र उभारले आहे. संस्थेने 15 ऑगस्टपर्यंत पुणे आणि परिसरातून आलेल्या 15 हजार सॅम्पल्सच्या चाचण्या केल्या आहेत. परंतु हा संसर्ग वेगाने फैलावत असल्याने चाचण्या पूर्ण करण्यासाठी सध्याच्या पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. संस्थेमधील उपलब्ध यंत्रांच्या क्षमतेनुसार दररोज 250 चाचण्या घेणेच शक्‍य आहे. ही अडचण दूर करण्यासाठी संस्थेला नवीन अत्याधुनिक आरटी-पीसीआर ( रिव्हर्स ट्रान्सस्क्रिप्ट्‌स पॉलिमर्स चेन रिऍक्‍शन) यंत्राची गरज होती.

येवा वाढल्याने खडकवासला धरणातील विसर्गात वाढ

आयसीआयसीआय लोम्बार्डने "आयसर'साठी यंत्र पुरविण्यासाठी आवश्‍यक असलेला निधी देण्यासाठी पुढाकार घेऊन वीस लाख रुपयांचा निधी पुरविला आहे. नवीन उपकरणांमुळे दररोजची चाचण्यांची क्षमता पाचशेपर्यंत वाढणार आहे.

Video : रामभक्तांसाठी आनंदाची बातमी; रामाची चलनी नोट आहे पुण्यात!

"आयसर'चे अधिष्ठाता (संशोधन आणि विकास) प्रा. संजीव गलांडे या मदतीबद्दल बोलताना म्हणाले की, आयसीआयसीआय लोम्बार्डच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळेच आमच्या कोविड-19 केंद्रात चाचण्यांच्या वेळेत बचत झाली असून केंद्राची क्षमताही वाढली आहे.
"आयसीआयसीआय लोम्बार्ड'चे व्यवस्थापकीय संचालक व विशेष कार्यकारी अधिकारी भार्गव दासगुप्ता म्हणाले की, समाजाच्या हितासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डने सदैव सक्रिय भूमिका बजावली आहे.

loading image
go to top