Pune Mumbai Missing Link: १२४९ मिमी पाऊस झाला तरी मिसिंग लिंक सुरक्षित राहणार, १ हजार वर्षांच्या पर्जन्यमानाचा वेध; मुंबई आयआयटीचा अहवाल

1249 mm rainfall infrastructure safety study: मुंबई आयआयटीच्या सर्वेक्षणानंतर मिसिंग लिंकसाठी १,००० वर्षांच्या पर्जन्यमानाचा अभ्यास; १२४९ मिमी पावसातही सुरक्षिततेसाठी नवा आराखडा, दरडी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना
IIT Bombay Backs Missing Link Project with Scientific Rainfall Risk Assessment

IIT Bombay Backs Missing Link Project with Scientific Rainfall Risk Assessment

sakal

Updated on

पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’वर दरडी कोसळल्याने १८ तास वाहतूक बंद होती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) याची दखल घेत भविष्यात दरडी पडण्याच्या धोका कमी करण्यासाठी मुंबई ‘आयआयटी’च्या पथकाकडून सर्वेक्षण केले. याचा अहवाल नुकताच ‘एमएसआरडीसी’ला प्राप्त झाला असून, यात एक हजार वर्षाच्या पर्जन्यमानाचा वेध घेण्यात आला आहे. भविष्यात १२४९ मिमी इतका पाऊस झाला तरीही ‘मिसिंग लिंक’ सुरक्षित राहील, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com