esakal | जेजुरी आणि रांजणगाव येथील दोन नवीन ऑक्सिजन प्लांटला तातडीने वीजपुरवठा

बोलून बातमी शोधा

oxygen plant
जेजुरी आणि रांजणगाव येथील दोन नवीन ऑक्सिजन प्लांटला तातडीने वीजपुरवठा
sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या मे. कायचंद्रा आयर्न इंजिनिअरींग व रांजणगाव स्थित मे. ऑक्सी-एअर ( Oxy-Air) नॅचरल रिसोर्सेस या दोन ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यांचे नवीन कनेक्शनचे अर्ज प्राप्त होताच आवश्यक वीज यंत्रणा उभारुन युद्धपातळीवर वीज जोडणी देण्याचे काम महावितरणने दोन दिवसांत केले आहे. कायचंद्रा प्रकल्पाची दैनंदिन ऑक्सिजन उत्पादन क्षमता 12.5 मेट्रीक टन असून ऑक्सी-एअर रांजणगावची दैनंदिन क्षमता साधारण 8 मेट्रीक टन इतकी आहे.

हेही वाचा: पुणे : वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता जैववैद्यकीय कचऱ्यासाठी विघटन प्रकल्प

सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर जास्तीचा ऑक्सिजन पुरवठा युद्धपातळीवर होणेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही प्रकल्प त्वरीत कार्यन्वित होणेसाठी लक्ष ठेवून होते. त्यासाठी त्यांचे स्तरावरुन सातत्याने पाठपुरावा चालू होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी युद्ध पातळीवर कामे पूर्ण करुन दोन्हीही कंपन्यांचा वीज पुरवठा ताबडतोब चालू करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व तसेच काम करणाऱ्या ठेकेदाराला दिल्या होत्या. याकामी महावितरणच्या रांजणगाव व जेजुरी येथील अभियंता व वीज कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. त्यामुळे संपूर्ण कामे दोन दिवसांच्या आत पूर्ण करुन शुक्रवार (ता. 23) वीजपुरवठा चालू करणे शक्य झाल्याचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर