उद्योग क्षेत्रावर मंदीचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

‘देशात मंदी सदृश वातावरण असले, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सध्या भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या संक्रमण पर्वातून वाटचाल करीत आहे. वाहन निर्मिती, वाहनाचे सुट्या भागांची निर्मिती, बांधकाम उद्योग या क्षेत्रावर मंदीचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला आहे. परंतु नजीकच्या काळात परिस्थिती सुधारेल,’’ असे मत उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले.

पिंपरी - ‘देशात मंदी सदृश वातावरण असले, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सध्या भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या संक्रमण पर्वातून वाटचाल करीत आहे. वाहन निर्मिती, वाहनाचे सुट्या भागांची निर्मिती, बांधकाम उद्योग या क्षेत्रावर मंदीचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला आहे. परंतु नजीकच्या काळात परिस्थिती सुधारेल,’’ असे मत उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रोटरी क्‍लब ऑफ चिंचवडच्या वतीने चिंचवड येथे आयोजित शिशिर व्याख्यानमालेमध्ये ‘आर्थिक मंदी व उपाययोजना’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यामध्ये अर्थतज्ज्ञ अभय टिळक, मराठा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरलचे माजी सरसंचालक अनंत सरदेशमुख, उद्योजक किशोर देसाई, संजय खानोलकर यांनी सहभाग घेतला. क्‍लबचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, सचिव प्रवीण गुणवरे उपस्थित होते. या वेळी रोटरीच्या पुस्तिकेचे प्रकाशन केले. 

Video : बारावी परीक्षेसाठी ‘सकाळ’चे मार्गदर्शन

टिळक म्हणाले, ‘‘मंदी कमी करण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. मात्र याचा परिणाम त्वरित दिसून येणार नाही. आपण मंदीजवळ देखील नाही आणि मंदी खूपच आहे, असे समाजात दोन टोकाचे विचार करणारा वर्ग निर्माण झाला आहे. मंदीचे वारे गेल्या १२ वर्षांपासून फिरत आहे. त्यामागे बरीच कारणे आहेत.’

राज्य सरकारने महापालिका निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय

सरदेशमुख म्हणाले, ‘‘सध्या मंदी किंवा अर्थव्यवस्था सुस्त (स्लो-डाऊन) झाली आहे. यात अस्पष्टता दिसते. पगार कपात झाल्यास मंदी आहे. पगारवाढ कमी झाल्यास स्लो डाऊन समजायचे. मात्र कृषी क्षेत्रात उत्पन्न आणि गुंतवणूक खुंटली आहे. समस्या खूपच वाढल्या. नोकरी दर फक्त २.१ टक्के इतकाच आहे, असे नकारात्मक चित्र दिसत आहे.’’

देसाई म्हणाले, ‘‘उद्योजकांसाठी मंदी म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे. कोणतेही सरकार असोत उद्योगक्षेत्राच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. मात्र उलट महसुलाच्या दृष्टीने उद्योगक्षेत्र सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजले जाते. सरकारने औद्योगिक क्षेत्राकडे लक्ष दिल्यास मंदी कायमस्वरूपी हद्दपार होईल.’’

खानोलकर म्हणाले, ‘‘उद्योगात नवनिर्मिती, कौशल्यपूर्णता, नैपुण्यता आणली गेली पाहिजे. उद्योगांना शासकीय मदत मिळाली पाहिजेत. मंदीमुळे नफा कमी झाला आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The impact of the downturn on the industry sector