बीएसएनल कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा कामकाजावर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

बीएसएनलच्या बारामती विभागातील 79 पैकी तब्बल 63 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने कामकाजावर त्याचा चांगलाच परिणाम झाला आहे. अवघ्या 16 कर्मचा-यांवर बीएसएनलचे कामकाज सध्या सुरु असून उरलेल्या कर्मचाऱ्यांवर 79 कर्मचा-यांच्या कामाचा बोजा येऊन पडला आहे.

बारामती : बीएसएनलच्या बारामती विभागातील 79 पैकी तब्बल 63 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने कामकाजावर त्याचा चांगलाच परिणाम झाला आहे. अवघ्या 16 कर्मचा-यांवर बीएसएनलचे कामकाज सध्या सुरु असून उरलेल्या कर्मचाऱ्यांवर 79 कर्मचा-यांच्या कामाचा बोजा येऊन पडला आहे.

पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग

बीएसएनएलने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केल्यानंतर अनेक कर्मचा-यांनी या योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. चांगली योजना वाटल्याने बारामती विभागातील 63 जणांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारली. 42 महिन्यांचा पगार ही कमाल भरपाई दिली गेल्याने अनेकांनी हीरक्कम स्विकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामती तालुक्यात बारामती शहरासह, एमआयडीसी, वालचंदनगर, माळेगाव, भिगवण, सुपे, मुर्टी, शिर्सुफळ, पणदरे या सह इतरही अनेक विभागांचा समावेश आहे. बारामती पंचक्रोशीत मोबाईलच्या अतिक्रमणानंतरही लँडलाईनची पाच हजारांवर कनेक्शन्स असून ब्रॉडबँडची साडेतीन हजारांच्या आसपास कनेक्शन्स आहेत. त्या मुळे या ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासह इतरही कामकाजाचा भार 16 कर्मचा-यांवर येऊन पडला आहे. 

पुण्यातील गोल्ड जिमला ग्राहक मंचाचा दणका

एरवी कर्मचा-यांची लगबग असलेले बीएसएनएलचे कार्यालय या स्वेच्छानिवृत्तीच्या झटक्यानंतर अक्षरशः सुने सुने वाटत होते. अनेक विभागातील टेबल खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसत होते. उपस्थित कर्मचा-यांनी आम्ही ग्राहकांना कसलीही अडचण येऊ देणार नाही असे सांगत दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी इतक्या कमी मनुष्यबळात विस्ताराने व्यापक असलेल्या बीएसएनएलचा गाडा कसा हाकला जाणार हा प्रश्न निर्माण होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Impact on Work retirement of BSNL employees in baramati

Tags
टॉपिकस
Topic Tags: