मंचर शहरात आता होणार धारावी पॅटर्नची अंबलबजावणी; काय आहे धारावी पॅटर्न

मंचर (ता.आंबेगाव) - सर्वेपक्षीय कार्यकर्ते व्यापार्यांच्या बैठकीत बोलताना शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा व अन्य.
मंचर (ता.आंबेगाव) - सर्वेपक्षीय कार्यकर्ते व्यापार्यांच्या बैठकीत बोलताना शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा व अन्य.
Updated on

मंचर - मंचर शहरात कोरोना साथीने कहर केला आहे. दररोज २० ते २५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना साथ रोखण्यासाठी शनिवार (ता. ५) ते शुक्रवार (ता. ११) या कालावधीत मंचर शहरात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंबलबजावणी करण्याचा व धारावी पॅटर्नची अंबलबजावणी करण्याचा निर्णय सर्व पक्षीय कार्यकर्ते, व्यापारी यांच्या बैठकीत घेण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंचर शहरात ४०३ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. अत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १७८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. मंचर ही तालुक्याची मुख्य बाजारपेठ आहे. तालुक्यातील १०४ गावे, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यातील एकूण ७० गावातील नागरिकांचाही येथे शेतीमाल व व्यापारानिमित्त दैनंदिन संपर्क येतो. वाढत्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहून प्रशासनही हतबल झाले आहे. दरम्यान, “शहरातील ६० वर्षा पुढील जेष्ठांची व लक्षणे असणाऱ्या नागरिकांची मोफत रॅपिड एंटीजन टेस्ट सरकारी व खासगी डॉक्टरांकडून  केली जाणार आहे.” असे शरद बँकचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी सांगितले.

मंचर(ता.आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी अरुणा दता थोरात, राजाराम बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, बाळासाहेब बेंडे, राजू इनामदार, सुनील बाणखेले, संजय थोरात, युवराज बाणखेले, वसंतराव बाणखेले, अल्लू इनामदार, महेश मोरे, सागर काजळे, अरुण बाणखेले, अरुण लोंढे, सोमनाथ खुडे, दिलीप महाजन पंडित माशेरे उपस्थित होते.

डॉ. सचिन गाडे, डॉ. विनायक खेडकर, डॉ. सुनील खिवसरा, डॉ. ओंकार काजळे यांनी जनजागृती बाबत मार्गदर्शन केले. “राजकीय मतभेद बाजूला ठेऊन कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. धारावी पॅटर्नप्रमाणे प्रत्येक वार्ड साठी कार्यकर्ते, डॉक्टर, आशा वर्कर यांच्या समितीमार्फत सर्वेक्षण व जनजागृती करून वैद्यकीय चाचण्या केल्या जातील. आरोग्य खात्यातील कर्मचारी, पोलीस, सरकारी व खासगी डॉक्टरानी फार चांगले काम केले आहे. सर्वेक्षणाच्या कामात नागरिकांनी सहकार्य करावे. प्रमाणित मास्क व सोशल डिस्टन्सचा वापर करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.” असे आव्हान शहा व राजाराम बाणखेले यांनी केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com