esakal | मॉन्सूनबाबत महत्वाची बातमी; पुण्यात होणार 'या' तारखेला दाखल

बोलून बातमी शोधा

monsoon.jpg

सध्याच्या अंदाजानुसार 8 जूनला मॉन्सून सिंधुदुर्गात दाखल होईल, तर 14 जूनला तो संपूर्ण राज्य व्यापेल. त्याच दरम्यान पुण्यातही पाऊस सुरु होईल. 

मॉन्सूनबाबत महत्वाची बातमी; पुण्यात होणार 'या' तारखेला दाखल
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे ः अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्याने जर उत्तरेकडे वाटचाल केली तर राज्यात येण्यासाठी मॉन्सूनची वाट सुलभ होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनुपम काश्‍यपि यांनी दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सध्याच्या अंदाजानुसार 8 जूनला मॉन्सून सिंधुदुर्गात दाखल होईल, तर 14 जूनला तो संपूर्ण राज्य व्यापेल. त्याच दरम्यान पुण्यातही पाऊस सुरु होईल. अरबीसमूद्रात येमेनच्या बाजूला अजून एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो ओमानच्या दिशेने प्रवास करेल. त्याचा कोणताही परिणाम माॅन्सूनवर होणार नाही. केरळ जवळ तयार होणारा कमी दाबाचा पट्टा सोमवार (ता.1) पर्यंत पूर्णतः विकसित होईल. त्यानंतर त्याच्या प्रवासाची दिशा निश्‍चित करता येईल, असे डॉ. काश्‍यपि यांनी सांगितले. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. 

Video : चांदणी चौक येथे अॅसिड गळती; नागरिकांना डोळे चुरचुरण्याचा त्रास!

पुर्वमान्सूनची शक्‍यता 
पुण्यासह राज्यात रविवार (ता.31) नंतर दुपारी आकाश अंशतः ढगाळ असेल, तर तुरळक ठिकाणी पुर्वमान्सूनचा पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने सांगितले आहे. शहरातील तापमानातही घट झाली असून गुरुवारी (ता.28) कमाल सरासरी तापमान 37.6 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर किमान तापमान 23.9 अंश सेल्सिअस होते. शनिवार (ता.30) पर्यंत शहर आणि परिसरातील सरासरी तापमानाची स्थिती अशीच असेल, परंतु दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ असण्याची शक्‍यता, हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. मंगळवार (ता.2) नंतर शहरात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पुर्वमान्सून पाऊस होऊ शकतो, असे डॉ.काश्‍यपि यांनी सांगितले. 
पुणे : चांदणी चौकात ऍसिडगळती; वाहतूक वळवली
तर अरबी समुद्रातले पहिले चक्रीवादळ 
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील 24 ते 48 तासांत त्याची तीव्रता वाढून तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. त्याच्या तीव्र चक्रीवादळ तयार होईल की नाही, याचा अंदाज वर्तविता येईल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. हे चक्रीवादळ तयार झाल्यास या वर्षीचे अरबी समुद्रातील पहिले चक्रीवादळ ठरेल. गेल्या वर्षी अरबी समुद्रात पाच चक्रीवादळ घोंगावली होती. 105 वर्षांमध्ये प्रथमच इतक्‍या मोठ्या संख्येने अरबी समुद्रात वादळे निर्माण झाल्याने या कमी दाबाच्या क्षेत्रावर हवामान विभाग बारकाईने लक्ष ठेऊन आहे.

- शाळा सुरु झाल्यावर मुलांचे कसे होणार? पालकांनो, चिंता करु नका कारण...

पुढील दोन तीन दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि मध्यमहाराष्ट्रात असलेली उष्णतेची लाट कमी होणार आहे. त्यानंतर पुर्वमान्सून पावसायोग्य वातावरण तयार होईल. पुणेकरांच्या पुढील महिन्याची सुरवात पुर्वमान्सून पावसाने होण्याची दाट शक्‍यता आहे. -डॉ. अनुपम काश्‍यपि, वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग.