आंबेगाव, जुन्नर, शिरुर, खेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

आंबेगाव, जुन्नर, शिरुर, खेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

निरगुडसर : आंबेगाव, जुन्नर, शिरुर, खेड तालुक्यातील सन २०२०/२१ या वर्षात बिबटयाच्या हल्ल्यात नुकसानीपोटी गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेली ९३४ प्रकरणातील १ कोटी रुपयांची भरपाई सरकारने शेतक-यांचा खात्यावर जमा केली आहे. सकाळच्या बातमीनंतर सरकारला जाग आली असून शेतक-यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाल्याने शेतक-यांनी सकाळ दैनिकाचे आभार व्यक्त  केले.

गेल्या आठ महिन्यांपासून बिबटयाच्या हल्ल्यात झालेल्या नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत बळीराजा होता गेले अनेक महिने शेतकरी भरपाईची वाट पाहत होता परंतु भरपाई काही मिळेना सुरुवातीला नोव्हेंबर पर्यंत १०२९ मंजुर प्रकरणापैकी १२७ प्रकरणातील १३ लाख रुपये संबधित शेतक-याला मिळाले होते. परंतु उर्वरित ९०२ प्रकरणाचे ९३ लाख रुपयांची भरपाई मिळणे बाकी होते. बिबटयाने हल्ला केल्यानंतर त्यांचा पंचनामा होऊन प्रकरण मंजुर होऊन त्याची नुकसान भरपाई संबंधित शेतक-याच्या बॅंक खात्यावर  जवळपास महिन्याच्या आतच जमा केली जाते. परंतु कोरोनामुळे शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने गेल्या आठ महिन्यांपासून ९०२ प्रकरणे मंजुर झाली आहेत परंतु त्याची भरपाई अदयाप शेतक-याला मिळाली नसल्याने शेतक-यांमध्ये उदासीनता होती.

बिबटयाने हल्ले करुन नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाईपासुन वंचित राहण्याची वेळ आल्याची बातमी सकाळ दैनिकात प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर नुकसान भरपाई देण्याच्या कामाला वेग आला त्यानंतर तातडीने वंचित  शेतक-यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

बेलसरवाडी-निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील  शेतकरी संदीप पोखरकर म्हणाले की, ''बिबटयाच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा पंचनामा होऊन आठ ते नऊ महिने लोटले तरी भरपाई काही मिळेना. आम्ही भरपाईची वाट पाहणेच सोडून दिले होते. परंतु दैनिक सकाळमध्ये  शेतक-यांना भरपाई तातडीने मिळावी ही बातमी आल्यानंतर मला नुकसानीपोटी १८००० रुपये माझ्या खात्यावर जमा झाल्याने मी दैनिक सकाळचे मनापासुन धन्यवाद मानतो.

अजुनही ४४ लाख येणे बाकी- आंबेगाव, जुन्नर, शिरुर, खेड तालुक्यातील सन २०२०/२१ या वर्षात बिबटयाच्या हल्ल्यात नुकसानीपोटी जानेवारी २०२१ अखेर एकुण १५०६ मंजुर प्रकरणापैकी १०६१ प्रकरणाचे १ कोटी १२ लाख ८१ हजार १२० रुपयांची भरपाई शेतक-यांचा खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. अजून उर्वरित ४४५ प्रकरणाचे ४४ लाख १६ हजार ३३२ रुपये शेतक-यांना मिळणे बाकी आहे. तरी सरकारने तात़डीने उर्वरित रक्कम शेतक-यांना दयावी अशी मागणी होत आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com