Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! दहीहंडीनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल; 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे
Pune Traffic
Pune TrafficSakal

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. अशातच दहीहंडी पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे दहीहंडी उत्सवानिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आलेले आहेत.

शहराच्या मध्य भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक संध्याकाळी ५ ते दहीहंडी संपेपर्यंत वाहतूक वळवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केलं आहे.

पुण्यात दरवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. पुण्यातील दहीहंडी उत्सव सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लोक येतात. या काळात पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, हीच गोष्ट लक्षात घेऊन यंदा दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहे.

Pune Traffic
Marathi News Live Update: मुख्यमंत्री आज दिवसभर ठाण्यातील प्रतिष्ठित दहीहंडींना लावणार हजेरी

बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे होणारी वाहतुक एकेरी होणार आहे. याशिवाय मजूर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजूर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई अशा रस्त्यांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्ग वापरावा, असं वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Pune Traffic
India vs Bharat: 'इंडिया विरुद्ध भारत' वादावर बोलू नका, PM मोदींचा खासदारांना कानमंत्र; वादावर न बोलण्यासंबधी सांगितलं मोठं कारण

त्याचबरोबर शहरातील पीएमपीएल बस मार्गातही मोठे बदल करण्यात आलेले आहेत. बसमार्ग क्र. ५० शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरून जाणार आहे. तर बस मार्ग क्र. ११३ अ. ब. चौक ते सांगवी या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर मनपा भवन स्थानकावरून जाणार आहे.

याशिवाय बस मार्ग क्र. ८, ९, ५७, ९४, १०८, १४३, १४४, १४४ अ या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता डेक्कन जिमखाना, मनपा भवन, गाडीतळ या मार्गाने जाणार आहे. तर बस मार्ग क्र. १७४ ही बस रस्ता बंद झाल्यानंतर गाडीतळ मनपा, डेक्कन मार्गे धावणार आहे.

Pune Traffic
Weather Update : राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; वाचा हवामान विभागाचा अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com