महत्वाची बातमी! दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा सवलतीच्या गुणांना लागणार मुकावं 

exam
exam
Updated on

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहावीच्या परीक्षेत शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नयेत, असा आदेश उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाने जाहीर केला. मात्र, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांकडून याआधीच सवलतीच्या अतिरिक्त गुणांची माहिती मागविली आहे. राज्यभरातील हजारो शाळांनी लाखो विद्याथ्यांच्या कला गुणांची माहिती मंडळाकडे पाठवली आहे. असे असताना अचानक हे सवलतीचे कला गुण न देण्याचा अध्यादेश निघाल्याने शिक्षक, मुख्याध्यापकांसह पालकांनाही ‘धक्का’ बसला आहे.

मिनरल वॉटरच्या नावाने साधं पाणी विकणाऱ्यांना बसणार चाप; सरकारनं उचललं महत्वाचं पाऊल

कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली कला संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या कला शिक्षण प्रशिक्षण पदविका (एटीडी) आणि मूलभूत अभ्यासक्रम (फाऊंडेशन) या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी, प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक वर्षात 'इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षा’ उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परंतु राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासकीय रेखाकला (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२० चे आयोजन करण्यात येऊ नये, असा प्रस्ताव कला संचालनालयासमोर होता. हा प्रस्ताव विचारात घेऊन ‘शासकीय रेखाकला परीक्षा २०२०’ चे न घेण्याचे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिले आहेत. दरम्यान, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येऊ नयेत, असेही आदेशात म्हटले आहे.

"ममता बॅनर्जी किम जोंग उनसारख्या निर्दयी"; गिरीराज सिंह भडकले!

दहावीची बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे सवलतीचे गुण शाळांनी राज्य मंडळाकडे दिलेले असताना आता हे गुण ग्राह्य धरण्यात येऊ नये असा निर्णय घेणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत. तर या आदेशामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातवरण निर्माण झाले आहे.

गुणांना कोरोना महामारीचा बसला फटका?

‘‘दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतचा शालेय शिक्षण विभागाचा मूळ अध्यादेश ग्राह्य धरला जातो. त्यानुसार, विद्यार्थ्यांना गुण देण्यात येतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा झालेली नाही. त्यामुळे ते गुण देण्याचा संबंध येत नाही. परंतु सध्या दहावीत असणारे विद्यार्थी हे इयत्ता नववी पर्यंतच एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा देतात. अशा विद्यार्थ्यांना त्याचे गुण देण्यात काही अडचण येईल, असे वाटत नाही. तरी देखील नव्याने आलेल्या सवलतीच्या कला गुणांबाबतच्या अध्यादेशाची सविस्तर माहिती घेतली जाईल,’’ असं राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले स्पष्ट केलं. 

"शासनाचा निर्णय अत्यंत चुकीचा" 

‘‘दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा सवलतीचे कला गुण न देण्याचा शासनचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. या विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी, नववीमध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या या अतिरिक्त गुणांची माहिती राज्य मंडळाला काही महिन्यांपूर्वीच पाठविलेली आहे. परंतु, या निर्णयामुळे सरकारने कला विषयाला दुय्यम स्थान नव्हे, तर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. राज्यातील जवळपास सहा-सात लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. या निर्णयाचा फटका या विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा आणि विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा,’’ अशी मागणी पुणे जिल्हा कला अध्यापक संघाचे कलाशिक्षक आणि सदस्य जेम्स साकरे यांनी सांगितलं. 

असे मिळतात सवलतीचे कला गुण :

इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेत मिळालेले ग्रेड : मिळणारे सवलतीचे गुण
                                                ग्रेड ए : सात गुण
                                               ग्रेड बी : पाच गुण
                                               ग्रेड सी : तीन गुण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com